For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्लू अर्जुनसोबत पुन्हा झळकणार रश्मिका

06:21 AM Jul 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
अल्लू अर्जुनसोबत पुन्हा झळकणार रश्मिका
Advertisement

राका’मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

Advertisement

पुष्पा चित्रपटात रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. आता ही जोडी ‘राका’ चित्रपटात पुन्हा एकत्र दिसून येणार आहे. रश्मिका यात महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे समजते. दिग्दर्शक एटलीच्या या चित्रपटावरून सध्या मोठी चर्चा सुरू आहे.

या चित्रपटात रश्मिकासोबत मृणाल ठाकूर आणि जान्हवी कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येऊ शकते. शाहरुख खान या चित्रपटात कॅमियो करण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे पोस्टर यापूर्वीच निर्मात्यांनी जारी केले आहे. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचा चेहरा फरमागे आंशिक स्वरुपात दडलेला दिसून येतो, ज्यात त्याच्या लुकला अत्यंत वाइल्ड आणि दमदार दाखविण्यात आले आहे.  राका चित्रपटाचे बजेट 700 कोटी रुपयांहून अधिक असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर्सकडून करण्यात येत आहे. मुंबईत याचे चित्रिकरण पार पडणार आहे. निर्माते हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित करण्याची योजना आखत आहेत. एटलीचा हा चित्रपट भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असेल असे मानले जातेय.

Advertisement

Advertisement
Tags :

.