For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुबेर मध्ये रश्मिका मंदाना

07:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुबेर मध्ये रश्मिका मंदाना
Advertisement

रश्मिका मंदाना ही दक्षिणेतील सर्वात गाजलेली अभिनेत्री मानली जाते. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे तिच्या कारकीर्दीला मोठे यश मिळाले आहे. आगामी काळात ती दिग्दर्शक शेखर कम्मूला यांच्या ‘कुबेर’ चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटामुळे रश्मिका मंदानाचे नाव दीर्घकाळापासून चर्चेत आहे. कुबेर चित्रपटातील तिचा फर्स्ट लुक व्हिडिओ सादर करण्यात आला आहे. यात ती पैशांनी भरलेली एक बाहेर नेत असल्याचे दिसून येते. मागील वर्षी रणवीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘अॅनिमल’ या चित्रपटात गीतांजली ही भूमिका साकारत रश्मिकाने चाहत्यांची मनं जिंकली होती. हीच कमाल ती ‘कुबेर’ चित्रपटाच्या माध्यमातून करू शकते. फर्स्ट लुक व्हिडिओत रश्मिका एका ख•dयातून पैशांनी भरलेली बॅग काढताना दिसून येते. अभिनेत्रीने ख•dयात खजिना लपविल्याचे आणि नंतर तो बाहेर काढत असल्याचे यात दिसून येते. परंतु या नोटांनी भरलेल्या बॅगचे रहस्य काय हे कुबेर चित्रपट पाहिल्यावरच समजणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना ही दक्षिणेतील दिग्गज अभिनेता धनुषसोबत झळकणार आहे. धनुषसोबत या चित्रपटात सुपरस्टार नागार्जुन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.