For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

राशिवडेच्या मैदानात सिकंदरचीच बाजी ! हरियाणा केसरीचा मल्ल सोनुकुमार पराभूत

07:16 PM Mar 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
राशिवडेच्या मैदानात सिकंदरचीच बाजी   हरियाणा केसरीचा मल्ल सोनुकुमार पराभूत

भोगावती/प्रतिनिधी

सुरुवातीपासूनच कुस्ती शौकीनांची उत्सुकता वाढविलेल्या राशिवडे कुस्ती मैदानात गंगावेश तालमीचा महाराष्ट्र केसरी मल्ल सिकंदर शेख याने बाहेरील टांग डावावर हरियाणाचा केसरी मल्ल सोनु कुमार याला केवळ दोन मिनिटांत अस्मान दाखविले.विजयाचा या रोमहर्षक क्षणाने हजारो कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले. यानिमित्त कुस्ती शौकीनांनी दिलेल्या प्रोत्साहनाला वेगवान निकाली कुस्ती करून सिकंदरनेही तेवढीच दाद दिली.हिंदवी ग्रुप राशिवडे यांच्यावतीने नेटके व देखणे संयोजन केलेले निकाली कुस्ती मैदान शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता परशुराम विद्यालयाच्या भव्य प्रांगणात झाले.यासाठी कागलच्या शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतराजे घाटगे प्रमुख पाहुणे होते.तर मुख्य पंचाची कामगिरी वस्ताद सागर चौगले यांनी पार पाडली.

Advertisement

मैदानात महाराष्ट्र चँम्पियन सोनपाल सोनटक्के कंदर टेंभुर्णी विरुद्ध महाराष्ट्र चँम्पियन इचलकरंजी यांच्यातील दुसऱ्या क्रमांकाची लढत तब्बल अर्धा तास रटाळ झाली.त्यानंतर सोनपाल सोनटक्के याला गुणावर विजयी घोषित करण्यात आले.तिसऱ्या लढतीत महाराष्ट्र चँम्पियन ओंकार चौगले ठिकपुर्ली याने एकलांगी डावावर नँशनल चँम्पियन करतार कांबळे शाहूवाडी याच्यावर निर्विवाद विजय मिळविला.तर चौथ्या क्रमांकाच्या लढतीत अर्जूनवाडच्या अक्षय चौगले याने पायलावू घिस्सा डावावर आँल इंडिया चँम्पियन प्रतिक म्हेतर राशिवडे याला चितपट केले.तसेच पाचव्या क्रमांकाच्या लढतीत रोहन रंडे मुरगूड याने बँकथ्रो डावावर बाबा रानगे आरे याच्यावर विजय मिळविला.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.