महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राशी भविष्य

06:01 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रासंगिक-वक्री शनिचे परिणाम

Advertisement

अंतिम भाग

Advertisement

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिदेव हा पहिल्या आणि बाराव्या घराचा स्वामी आहे. यावेळी ते तुमच्या पहिल्या घरात प्रतिगामी असतील. त्यामुळे या लोकांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. दुसरीकडे, तुम्हाला अनावश्यक खर्चाचा समावेश असलेल्या अनावश्यक सहलीदेखील कराव्या लागतील. करिअरच्या बाबतीत, तुम्ही तुमचे जीवन सुधारण्यासाठी आणि नोकरीत समाधान मिळवण्यासाठी करिअर बदलण्याचा निर्णय घेऊ शकता, पण फलदायी नसल्यामुळे यावेळी करिअर बदल टाळणे चांगले. आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, या लोकांना अनपेक्षित स्रोतांकडून पैसे मिळतील ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. मीन : मीन राशीच्या लोकांसाठी शनि महाराज अकराव्या आणि बाराव्या घराचे स्वामी आहेत. शनि सध्या तुमच्या 12व्या भावात प्रतिगामी आहे. म्हणून, यावेळी तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष देणे आणि शहाणपणाने खर्च करणे आवश्यक आहे. शनि प्रतिगामी काळात तुम्हाला काहीसे अपूर्ण वाटेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर कामाचा दबाव असेल, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. कुंभ राशीत शनि प्रतिगामी झाल्यामुळे तुम्हाला आर्थिक जीवनात नफा-तोटा या दोन्ही गोष्टींना सामोरे जावे लागू शकते.

ही झाली चर्चा एका ग्रहाच्या गोचरीच्या परिणामाबद्दल. पण आकाशात जे सात ग्रह आणि दोन छायाग्रह आहेत तेही फिरत असतातच. पण शेवटी ही वक्री अवस्था किंवा गोचर म्हणजे काय? प्रत्येक ग्रह सूर्याभोवती वेगवेगळ्या वेगाने प्रदक्षिणा घालतो. संक्रमण करणारे ग्रह राशीचक्रातून वेगाने किंवा हळूहळू फिरू शकतात. प्रत्येकाची स्वत:ची ‘ऊर्जा’ असते. जेव्हा ते राशीच्या कोठे आहे यावर अवलंबून असते. त्यांच्या राशीच्या प्रवासाचा तुमच्या दैनंदिन भावनांवर परिणाम होतो. सूर्याच्या सर्वात जवळ असलेल्या ग्रहांना आतील ग्रह म्हणतात. हे संक्रमण करणारे ग्रह काही दिवस किंवा आठवडे राशीच्या चिन्हांमधून प्रवास करतात. आतील ग्रह म्हणजे सूर्य, चंद्र, बुध, मंगळ आणि शुक्र. कारण हे संक्रमण करणारे ग्रह राशीतून वेगाने फिरतात. परिणामी, ते तुमच्या दैनंदिन जीवनावर, मन:स्थितीवर आणि सवयींवर परिणाम करतात आणि तुमच्या लक्षात येईल की ज्योतिष शास्त्रातील ग्रहांमध्ये सूर्याचा समावेश आहे. सूर्यापासून दूर असलेले ग्रह बाह्या ग्रह म्हणून ओळखले जातात. या संक्रमण ग्रहांना एकाच राशीतून एक फेरफटका पूर्ण करण्यासाठी काही महिने किंवा वर्षे लागू शकतात. गुऊ, शनि, नेपच्यून, युरेनस आणि प्लूटो हे बाह्या ग्रह आहेत. कारण ते हळूहळू हलतात, ते तुमच्या आयुष्यातील मोठ्या टेंडला आकार देतात. कारण नेपच्यून, युरेनस आणि प्लूटो सूर्याभोवती इतक्मया हळू प्रदक्षिणा करतात, ते संपूर्ण पिढ्यांना आकार देतात असे म्हटले जाते. कल्पना करा की जन्मजात ग्रह पलंगावर बसून टीव्ही पहात आहे आणि अचानक, संक्रमण करणारा ग्रह खोलीत घुसतो. (हे सर्व आपण मंगळ, नेपच्यून किंवा शुक्राबद्दल बोलत आहोत यावर अवलंबून आहे). दोन ऊर्जा एकत्र झाल्यामुळे प्रतिक्रिया येते आणि परिणाम होतो.

आपल्याला आपल्या कामाव्यतिरिक्त इतर कामांची ही कधीच माहिती असते. घरात एखादी वस्तू बिघडली की आपण ती ठीक करण्याचा प्रयत्न करतो.  मोबाईलमध्ये अॅप्लिकेशन कशा डाऊनलोड करायच्या, त्याचा वापर कसा करायचा,  इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक्सची एखादी वस्तू बिघडली तर त्यात काय करायला पाहिजे हे आपल्याला माहिती असते इतकेच काय तर छोट्या-मोठ्या आजारावरती कुठली गोळी घ्यायची याचीही माहिती आपण करून घेतो. मग ज्योतिषीय साक्षरता किंवा आपल्या स्वत:च्या कुंडलीबद्दल जुजबी माहिती आपल्याकडे असायला काय हरकत आहे? या माहितीमुळे कित्येक वेळेला आपण गल्लाभरू ज्योतिषापासून वाचू शकतो, खरे काय आणि खोटे काय याची शहानिशा करू शकतो, कुठला दिवस आपल्याकरता चांगला आहे, वाईट आहे हे आपल्याला कळू शकते. ज्योतिषीय साक्षरता म्हणजे काय फार मोठे रॉकेट सायन्स नाही. प्रत्येकाला आपली रास माहिती असते. त्याचबरोबर आपल्या कुंडलीत प्रथम भाव म्हणजे लग्न कुठले आहे, आपले नक्षत्र कुठले आहे, त्या नक्षत्राची देवता कोणती, आराध्य वृक्ष कुठला, जन्मरास आणि जन्म नक्षत्राप्रमाणे कुठल्या तिथी आपल्याला शुभ आहेत, कोणत्या अशुभ आहेत, कोणती नक्षत्रे आपल्याकरता चांगली आहेत कोणती वाईट आहेत, घातवार कुठला, घात नक्षत्र कुठले, कोणत्या राशीसोबत आपण व्यवहार करू शकतो, कोणत्या राशीच्या लोकांबरोबर आपले पटणे अवघड असेल इत्यादी माहितीला मी ज्योतिषीय साक्षरता म्हणतो. आणि या सगळ्या गोष्टी स्वत: शोधून काढण्यापेक्षा किंवा एखाद्या सॉफ्टवेअरवर बघण्यापेक्षा जाणत्या माणसाकडे जाऊन त्या लिहून घेऊन आपल्याकडे ठेवून घेतलेल्या केव्हाही बऱ्या. चला तर मग, ज्योतिषीय साक्षर होऊया आणि निर्भयपणे जगूया.

 

मेष :

या आठवड्यात आपल्याला आपले नातेवाईक, भावंडे मित्र यांचा सुखद सहवास मिळण्याची शक्मयता आहे. एखाद्या समारंभात जाण्याची संधी मिळेल. मानसन्मान मिळण्याचीदेखील शक्मयता आहे. समाजातील आपला मान वाढेल. चांगल्या चांगल्या वस्तूंची खरेदी करण्याचा संभव आहे. अगर आपल्याला भेट म्हणून मिळण्याची शक्मयता आहे. एकंदरीत हा आठवडा आपल्याला छान जाईल.

उपाय : कुलदेवतेची आराधना करा.

वृषभ :

खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. योग्य त्या ठिकाणी खर्च करा. अपव्यय नको. परदेशवारी करण्याची संधी चालून येण्याची शक्मयता आहे. संधीचा लाभ उठवण्यास हरकत नाही. अध्यात्माकडे वळण्याची इच्छा होत असेल तर अवश्य अध्यात्माचा अभ्यास करा. मनाला शांति मिळेल. कोर्ट केस चालू असल्यास उशिराने का होईना यश मिळण्याची शक्मयता आहे. पण सांभाळून रहा.

उपाय : गणेशाची आराधना करा.

मिथुन :

मन चंचल होण्याची शक्मयता आहे. एखादा निर्णय घ्यायचा झाला तरी आपण द्विधा मन:स्थितीत निर्णय घेऊ शकणार नाही. त्याकरता मनावर ताबा ठेवा. त्याला शांत करा आणि मग विचारपूर्वक निर्णय घ्या. आपल्या निर्णयामुळे, आपल्या कार्यक्षमतेमुळे आपला नावलौकिक वाढण्याची शक्मयता आहे. एकंदरीत हा आठवडा आपल्याला शांत राहण्यास सांगतो आहे.

उपाय : महालक्ष्मीची उपासना करा.

कर्क :

आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या सहवासामुळे आपला हा आठवडा आनंदात जाण्याचा संभव आहे. आपल्या बोलण्याची लोकांवर छाप पडेल. पैतृक संपत्तीच्या बाबतीत घरात काही चर्चा चालू असेल तर त्यात आपला फायदा होण्याची शक्मयता आहे. एकंदरीत हा आठवडा आपला सुखासमाधानात व आनंदात जाण्याचा संभव आहे. पण क्षुल्लक कारणामुळे चिडचिड करू नका. आनंदी रहा.

उपाय : महादेवाची उपासना करा.

सिंह :

आपल्या कामाचे कौतुक झाल्याने आपल्या कष्टाचे चीज झाल्याचा आपल्याला अनुभव येईल. नोकरीत आपले वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. आपले नातेवाईक, भावंडे, मित्र यांच्या सहवासात हा आठवडा छान जाईल. कदाचित छोटा प्रवासही होण्याची शक्मयता आहे. आणि तोही कदाचित रेल्वेचा प्रवास होईल. खाण्याची चंगळ होईल. पण सांभाळून. पावसापाण्याचे दिवस आहेत.

उपाय : हनुमान चालीसाचा पाठ करा.

कन्या :

हा आठवडा आपल्या मातेच्या सहवासात जाण्याची शक्यता आहे. मातेच्या तब्येतीकडे लक्ष द्या. तिच्या भावनांना जपा. वाहन खरेदीचा विचार मनात येण्याची शक्यता आहे. खरेदी करण्यास काहीच हरकत नाही. जमिनीचे काही देण्याघेण्याचे व्यवहार चालू असल्यास नीट काळजीपूर्वक व विचार करून करा. एकंदरीत आपली सांपत्तिक स्थिती चांगली होण्याचा संभव आहे.

उपाय : भुकेलेल्याला खाऊ घाला.

तूळ :

मुलांच्या प्रगतीकडे पाहून समाधान वाटेल. पण तरीदेखील त्यांच्या अभ्यासात किंवा त्यांच्या को-करिक्मयुलर अॅक्टिविटीजमध्ये त्यांना तुमची मदत लागण्याची शक्मयता आहे. ती तुम्ही जरूर करा. लॉटरीसारख्या मार्गातून अचानक धनलाभ होण्याची शक्मयता आहे. आपण काही लिखाण करू इच्छित असाल तर अवश्य करायला हरकत नाही. यश मिळेल.

उपाय : गायीची पूजा करा.

वृश्चिक :

तब्येतीची काळजी घ्यावी लागण्याची शक्मयता आहे. गुप्त शत्रूपासून काहीतरी त्रास संभवतो. सांभाळून रहा. नोकरावर अति विसंबून राहू नका. लक्ष ठेवा. मन थोडे चंचल होण्याचा संभव आहे. शांत राहण्याचा प्रयत्न करा. काहीतरी चिंता आपल्याला सतावत राहण्याची शक्मयता आहे. चिंता करू नका. कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात असाल तर मिळण्याची शक्मयता आहे.

उपाय : नित्यनेमाने रोज माऊतीचे कोणतही स्तोत्र वाचा.

 

धनु :

व्यवसायात भागीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. आपली दैनंदिन प्राप्ती वाढण्याची शक्मयता आहे. पण उगाच कुणाबरोबर वादावादीत पडू नका. कोर्ट केस वगैरेच्या बाबतीत यश मिळण्याची शक्मयता आहे. एखादी हरवलेली वस्तू परत मिळण्याची शक्मयता आहे. प्राप्ती वाढली म्हणून ग ची बाधा आणू देऊ नका. एकंदरीत हा आठवडा समाधानकारक जाण्याची शक्मयता आहे.

उपाय : गुऊची उपासना करा.

मकर :

कोणती तरी मानसिक व्यथा आपल्याला सतावत राहण्याची शक्मयता आहे. पण चिंता ही फक्त मनालाच जळते असे नाही तर ती शरीराला पण जाळते. हे लक्षात ठेवा. स्त्राrकडून द्रव्यलाभ संभवतो, अथवा लॉटरी वा तत्सम प्रकारातून धनलाभ होण्याची शक्मयता आहे. पण ते धन स्वीकारताना खूप विचार करून ते स्वीकारा. तो पैसा योग्य मार्गाने मिळत असेल तरच स्वीकारा. अन्यथा गोत्यात येण्याचा संभव आहे.

उपाय : शनिची उपासना करा.

कुंभ :

काही परोपकार, दान धर्म करण्याची इच्छा झाली तर ती टाळू नका. ती इच्छा कृतीत आणा. जपतप इ. केल्याने साडेसातीचा त्रास थोडाफार सहनीय होण्याची शक्मयता आहे. कदाचित काही आपल्याला आनंद देणारी घटनाही घडण्याची शक्मयता आहे. तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळण्याचा संभव आहे. संधीचा फायदा घ्या. व तीर्थयात्रेला जाऊन या. सत्संग घडेल.

उपाय : हनुमान चालीसाचा निरंतर पाठ करा.

मीन :

कष्टाविण फळ ना मिळते या उक्तीचा आपल्याला या आठवड्यात प्रत्यय येईल. पण आपल्या कष्टाचे चीजही होईल. नोकरीत असाल तर वरिष्ठ आपल्या कामावर खुश होऊन आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्मयता आहे. मान वाढेल. व्यवसायात असाल तर भरभराट होण्याची शक्मयता आहे. नोकरीतील कामानिमित्त अथवा स्वत:च्या व्यवसायानिमित्त परदेशी जाण्याचा विचार करण्याचा संभव आहे.

उपाय : श्री दत्ताच्या कुठल्याही एका स्तोत्राचा दररोज पाठ करा.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#horoscope
Next Article