महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राशी भविष्य

06:01 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उपायच उपाय. . . तोडगेच तोडगे!!!! (भाग - 4)

Advertisement

रशियन लेखक  लिओ टोलस्टॉय याच्या मताप्रमाणे  माणूस जितका बुद्धिमान असतो  तितका त्याला दुसऱ्यामधील चांगुलपणा दिसतो.  सद्गुऊ वामनराव पै यांची विश्व प्रार्थना याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.  म्हणून मित्रहो  दुसऱ्याचे भले  चिंतणे,   दुसऱ्याचे चांगले कसे होईल त्याचा प्रयत्न करणे, याच्यासारखा मोठा तोडगा नाही,  कारण निसर्गाचा नियमच असा आहे की तुम्ही जे द्याल ते तुम्हाला परत मिळेल. असो. मंगळवारी किंवा शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली हनुमान चालीसाचे पाठ करणे  यासारखा  मनोकामना पुरती करणारा दुसरा उपाय नाही. आजारपण हे कुणालाही चुकलेले नाही. मग तो रंक असो की राजा. वैद्यकीय उपचारासोबतच, आजारी व्यक्तीने वापरलेल्या जुन्या कपड्यातील सुतापासून दोन वाती तयार कराव्यात आणि घरातील  देवासमोर  देशी गाईच्या तुपाच्या दिव्यात  लावाव्यात.   आजारपणातून बरे होण्याकरता मदत मिळते. शमीच्या झाडाला दूध मिश्रित पाणी घातल्यानेसुद्धा आजारपण बरे होण्याकरता मदत होते. बऱ्याचशा जोडप्यांमध्ये संवाद असतो. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम करते आणि दुसरी व्यक्ती या व्यक्तीला किंमत देत नाही. अशावेळी त्या व्यक्तीने वापरलेल्या कपड्यावरती थोडे सुगंधी  अत्तर  लावून  पाण्याने मधल्या बोटाने 1121 हा नंबर लिहा. जोडप्यामधील विसंवाद दूर होऊन प्रेम वाढते. सासुरवाशीणींनी हे कायम लक्षात ठेवले पाहिजे की माहेराहून सासरी तुम्ही हवे ते घेऊन जा, फळे घेऊन जा,  मिठाई घेऊन जा, कपडे घेऊन जा पण चुकूनसुद्धा लोणच्याची बरणी किंवा लोणचे घेऊन जाऊ नका. कलह वाढतो. त्राससुद्धा वाढतो. बरेच लोक आपल्याकडून पैसे घेतात आणि नंतर परत देण्याचे नावच घेत नाहीत,   थोडक्मयात  आपले  कष्टाने कमावलेले पैसे  बुडाल्यात जमा  होतात.  अशा वेळी एका  द्रोणामध्ये  थोडे कुंकू, पिवळी मोहरी, पाच लवंगा आणि पाच लाल मिरच्या  घालून  तो  द्रोण  पिंपळाच्या  झाडाखाली  अभिजीत मुहूर्तावरती मंगळवारी किंवा रविवारी  ठेवावा  आणि मनोभावे  प्रार्थना  करावी.  हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठीसुद्धा आहे.  मंगळवारी  हनुमंताच्या मंदिरात एक छोटी गदा आणि  गोड पान    ठेवून, ज्या व्यक्तीने पैसे घेतलेले आहेत त्याचे नाव सांगून  ‘आता तू जाणे  आणि तुझे काम जाणे’  असे  गाऱ्हाणे  घालून  यावे.  असे अकरा मंगळवार करावे.  चमत्कारिक  फलप्राप्ती होते. आपल्या सवयींनीसुद्धा आपण आपले ग्रह बिघडवतो.  जेवण केल्यावर अन्न  वाया  घालण्याने  गुऊ खराब होतो, नशीब बिघडते.  काही लोक ग्लास भरून पाणी घेतात आणि थोडेसेच पिऊन सोडतात.  याने चंद्र बिघडतो आणि मानसिक पीडा होते.  सिगारेट पिणारे सिगारेटचे थोटके पायाने  विझवतात  याने मंगळ खराब होतो. (अग्नी मंगळ). भावंडांशी नाहक  भांडण काढल्यानेही  मंगळ खराब होतो. पराक्रमामध्ये कमतरता येते,  धाडस कमी होते,  भीती वाटते.  फाटके कपडे घालणे ही आजकाल पॅशन  झाली आहे. याने शुक्र खराब होतो. बरकत येत नाही. चपलांची निगा  न राखल्याने  शनी खराब होतो, वारंवार आयुष्यात अडचणी येतात. काही लोक मोबाईल घेऊन  टॉयलेटमध्ये जातात. खराब इलेक्ट्रॉनिक सामान घरात ठेवतात याने राहू बिघडतो आणि अकस्मात संकटे येतात. घरासमोर किंवा सोसायटीसमोर कुत्रे बसले की त्याला दगड  मारणे,  हाकलणे याने केतू खराब होतो, नको ते प्रसंग बघावे लागतात. त्यामुळे या सवयी असतील तर त्या सोडलेल्या केव्हाही चांगल्या. चांगली नोकरी मिळत नसेल तर  रात्रभर भिजवलेले मूग पक्ष्यांना घालावे, प्रमोशनचा  मार्ग खुला होतो, नोकरी मिळते. छोटे मोठे आजारपण असेल किंवा  अंगात ताप भरत असेल, उष्णता वाढली असेल तर वैद्यकीय उपचारासोबत वाटीभर दह्यामध्ये  मूठभर  उडीद  घालून  ते  शिवलिंगावरती  अर्पण करावे, फायदा होतो.

Advertisement

मेष

अति ताण घेण्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. टेन्शन घेण्याचे कुठलेही कारण नसताना उगाच टेन्शन घेण्याची सवय टाळावी.  पैशांच्या बाबतीत सावध राहावे.  यात्रेचा योग आहे.  प्रॉपर्टीसंबंधी कामे जपून करा. नोकरदार   वर्गाने  कामात चूक होऊ नये, याची काळजी घ्यावी.  मान प्रतिष्ठा  प्राप्त होईल.

उपाय : घरातील देवासमोर तुपाचा दिवा लावा

वृषभ

उत्साहवर्धक काल आहे. कामामध्ये हात घालाल त्यामध्ये यश मिळेल. पण आर्थिक प्राप्ती थोडी उशिरा  होईल. प्रवासाचे बेत  आखाल. नोकरदार वर्गाला जास्तीच्या कामाचा सामना करावा लागेल, त्यामुळे थोडी चिडचिड होईल. वैवाहिक जीवन उत्तम असेल. एकमेकाला मदत कराल. या काळात अचानक धनलाभ होऊ शकतो.

उपाय :शंकराला  दीड  प्रदक्षिणा घालावी

मिथुन

आरोग्य चढउतार  संभवतो. अपेक्षेप्रमाणे धनप्राप्ती होणे थोडे कठीण दिसते.  कौटुंबिक वाद विवादाला सामोरे जावे लागू शकते. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. जमिनीचा व्यवहार सावधानतापूर्वक करावा. इन्व्हेस्टमेंटकरता चांगली वेळ आहे. नोकरदार वर्गाला फायद्याचे दिवस असतील. व्यावसायिकांना उत्तम लाभ संभवतो. गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील.

उपाय : उडीद दान द्यावे

कर्क

आरोग्याची काळजी घेणे आवश्यक ठरेल. कोणतेही दुखणे अंगावर काढू नका.   धनप्राप्तीचे योग आहेत. प्रवास करताना सांभाळून राहा. कोणत्याही प्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाला प्रमोशन इन्क्रिमेंट आणि कौतुक प्राप्त होईल. वैवाहिक जीवन उत्तम असेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

उपाय : लक्ष्मी नारायणाचे दर्शन घ्यावे

सिंह

या काळात मूड थोडासा नाराजीचा असू शकतो. मित्रांमुळे एखाद्या गोष्टीबद्दल  त्रास होण्याची शक्मयता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी जास्त कष्ट घ्यावेत. धनप्राप्ती उत्तम असेल. कुटुंबातील व्यक्तींमुळे आनंद मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये लहान-सहान कारणावरून वादविवाद संभवतात. अपघातापासून सावध रहा.

उपाय : मारुतीचा शेंदूर जवळ ठेवावा

कन्या

जो निर्णय घ्यायचा असेल तो ठामपणे घ्या. तब्येतीची विशेष काळजी करण्याचे कारण नसले तरीही पथ्य पाणी सोडू नये. लवकर पूर्ण होईल असे वाटत असताना कामांमध्ये विलंब होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तींच्या तब्येतीविषयी काळजी वाटेल. भावंडांबरोबरचे संबंध थोडे बिघडू शकतात.   बोलताना  योग्य शब्दांचा वापर करावा.

उपाय : तुळशीच्या सात परिक्रमा करा

तूळ

या आठवड्यात तब्येतीच्या थोड्या तक्रारी असतील पण पुढच्या आठवड्यात कमी होतील. ‘आमदानी अठन्नी आणि खर्चा ऊपया’  असा काहीसा योग होत आहे.   गुंतवणुकीतून उत्तम फायदा होऊ शकतो. प्रेमसंबंध आनंदमय असतील.   नोकरदार वर्गाला पदोन्नतीचे  चान्सेस आहेत. वैवाहिक जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

उपाय : केशराचा टिळा लावावा

वृश्चिक

पूर्वीच्या तब्येतीच्या तक्रारी होत्या त्या कमी झाल्याने बरे वाटेल. मनाची शांती  प्राप्त होऊ शकते. घरच्या लोकांमध्ये लहान-थोर करणारे वादविवाद होऊ  शकतात. इतरांशी बोलत असताना  चुकूनही चेष्टा करू नका,  याने वाद वाढू शकतात. प्रॉपर्टीची कामे या आठवड्यातच संपवून घ्या. नोकरदारांना पॉलिटिक्सपासून लांब राहणे बरे  असेल.

उपाय  : बडीशेप खाऊन बाहेर पडा

धनु

लहान सहान कारणाने  आरोग्य बिघडल्याने मन थोडे उदास असू शकते. एक प्रकारचा कंटाळा किंवा  वीट आल्यासारखे  वाटेल. पुढच्या आठवड्याच्या मानाने या आठवड्यात आर्थिक प्राप्ती चांगली असेल. शनिवार-रविवारी प्रवास कराल. छोट्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नोकरदार वर्गाला कटू अनुभव येऊ शकतात.

उपाय :अशोकाची तीन पाने जवळ ठेवा

मकर

तब्येतीला नजर लागू देऊ नका  आणि बाहेरचे खाणे पिणे  कमी करा. आर्थिक गुंतवणूक करण्याकरता  उत्तम कालावधी आहे. किमती वस्तू खरेदी कराल.  प्रवासाला जाणे टाळलेले बरे. प्रॉपर्टीच्या कामात काही अडथळे येऊ शकतात.  नोकरदार वर्गाला  संमिश्र्र अनुभव येतील. वैवाहिक जीवनात  तणाव जाणवेल.

 उपाय : तांबूस गायीची सेवा करा

कुंभ 

विनाकारण आत्मविश्वासामध्ये कमी येऊ देऊ नका.  आर्थिक बाबतीत भाग्यवान असाल. कुटुंबात थोडेसे गेट-टुगेदर होऊ शकते. प्रेसेंटेशनमध्ये सुधारणा होईल.   प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. गुंतवणूक करत असताना सावध राहावे.  कोणाच्याही बोलण्यात फसू नका.  वैवाहिक जीवन उत्तम असेल. व्यवसायिकांना फायदा असेल.

उपाय : तुळशी जवळील माती कपाळी लावा

मीन

तब्येतीच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवश्यक आहे. खास करून शुक्रवार नंतर  आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. आनंदोत्सवाच्या काळामध्ये काही विशिष्ट घटना घडल्यामुळे कुटुंबामध्ये थोडा कलह संभवतो. पैसा खर्च होण्याची शक्मयता आहे.  लहान भावंडांशी वाद होऊ शकतात. प्रॉपर्टीच्या बाबतीत भाग्यवान असाल.  गुंतवणुकीच्या दृष्टीने आणि यात्रेच्या दृष्टीने उत्तम काळ आहे.

  उपाय :पोवळे जवळ ठेवा

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#astro#social media
Next Article