कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राशी भविष्य

06:01 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लव यू   2024  जिंदगी!!!

Advertisement

उपायच उपाय: भाग-1

Advertisement

‘पुढे कधीतरी’... असे मी म्हणालो खरं  पण वर्षाच्या सुऊवातीला सुंदर उपाय सांगितले नाहीत तर त्याचा फायदा काय? चला उपायांना सुऊवात करूया.  गदिमांनी गीतरामायणात म्हटले आहे की ‘पराधीन आहे जगती पुत्र  मानवाचा’.  ज्योतिषाच्या दृष्टीने ही पराधीनता  ग्रहांच्या दृष्टीने असू शकते. असंख्य वाचकांनी  प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे  उपायांच्या बाबतीमध्ये विचारणा केली. गदिमा म्हणाले की ’पराधीन आहे’ पण यातील ‘पर’  हे हिंदीतील  ‘पर’  म्हणजे पंख  या दृष्टीने विचार केला  तर उपाय म्हणजे  पंखच आहेत. आपले आयुष्य सोपे व्हावे सुंदर व्हावे समृद्ध व्हावे म्हणून आपण आपल्या परीने सगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतो. ज्योतिषीय उपाय हे ग्रहांच्या ऊर्जेच्या माध्यमातून  केलेले तोडगे आहेत, यांचा एकमात्र उद्देश  म्हणजे हे तुम्हाला समजावून द्यावे  की ‘तुज पंख दिले देवाने कर विहार आनंदाने’. एक लक्षात घ्या तुम्ही परमेश्वर म्हणा, ईश्वर म्हणा, अल्लाह म्हणा, गॉड म्हणा किंवा प्रकृती म्हणा, ही प्रकृती तुम्हाला तुम्ही जे आहात  तेच देईल, लक्षात घ्या तुम्हाला जे हवे किंवा तुम्ही जे मागता ते नाही तर तुम्ही जे आहात ते देईल. हे एकदा कळले की उपायांचे मानसशास्त्र सहज समजून जाईल. उपायांना सुऊवात करण्यापूर्वी  तुम्हाला एक प्रŽ विचारतो. समजा तुम्ही आयुष्यभर पांढराच शर्ट घालत आला आहात. पांढरा स्वेटर, पांढरा शर्ट, पांढरा टी-शर्ट,  पांढरा झब्बा  इत्यादी. आणि तुमच्या वाढदिवसादिवशी तुमच्या मित्राला  तुम्हाला एक शर्ट  भेट द्यायचा आहे.  तो  कोणत्या रंगाचा  शर्ट तुम्हाला भेट देईल? पांढराच ना? जर तुम्ही तुमच्या पॅरेक्टरला, तुमच्या व्यक्तिमत्वाला कायम दु:खी, कष्टी, तक्रार करणारे, मला हे मिळाले नाही मला ते मिळाले नाही असे म्हणणारे अशा प्रकारचे बनवले असेल तुमच्या प्रार्थनेमागे संपूर्ण सृष्टी तुम्हाला काय   गिफ्ट देईल? तुम्ही जे आहात तेच आकर्षित करतात. हा आकर्षणाचा नियम  प्रत्येक उपायामागे लागू पडतो. मागच्या वेळेला तुम्हाला मी उपाय कसे काम करतात याबद्दल सांगितले होते. लक्षात घ्या की कुठलाही उपाय किंवा तोडगा करत असताना  संकल्प  किंवा नियत  करणे अत्यावश्यक आहे.  हा संकल्प  म्हणजे  तुम्ही  संपूर्ण ब्रम्हांडीय शक्तीला  दिलेली डिक्लेरेशन आहे असे समजा. म्हणजेच ब्रह्मांडीय शक्तीला तुम्ही आवाहन करून तुमच्या मनातील इच्छा सांगून एका विशिष्ट प्रकारे प्रार्थना करता.  आणि यालाच तोडगा म्हणतात आणि तोडगा म्हणजे सोल्युशन. सगळ्यात आधी आपल्याला एक काम करायचे आहे की डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे विघटनात्मक  हस्तक्षेप थांबवायचा आहे. मागच्या वेळेला तुम्हाला मी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरेन्सबद्दल सांगितले. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ज्या ठिकाणी आपल्याला गेल्यानंतर बरे वाटते, ज्या माणसाला आपल्याला भेटल्यानंतर बरे वाटते तिथे आपल्या लहरी त्या समोरच्या व्यक्तीशी किंवा वास्तुशी जुळत आहेत आणि त्या जुळल्यानंतर द्विगुणित होतात हे आपल्याला जाणवते आहे  अशा ठिकाणीच आपण जायचे किंवा असायचे. त्याच्या विऊद्ध म्हणजे जिकडे आपल्याला असमाधानी वाटते, ज्या व्यक्तीशी संबंध असताना आपल्याला असहज किंवा गुदमरल्यासारखे वाटते अशा व्यक्तींशी कमीत कमी संबंध ठेवायचा. हा पहिला तोडगा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण तिथे राहतो तिथली वास्तू आपल्याला साथ द्यावी म्हणून करायचा तोडगा हा  की चारी दिशांना बॅलन्स  करायचे. ते कसे करायचे तर पूर्वेकडच्या भिंतीवर लाकडी सूर्य (ज्याचा चेहरा हसरा आहे)  तो लावायचा, पश्चिमेकडे मोठ्या बिल्डिंगचा किंवा उंच पर्वताचा फोटो लावायचा, या ठिकाणी उडणाऱ्या घोड्यांचा फोटो सुद्धा लावू शकता. उत्तरेकडे कुबेराची मूर्ती किंवा फोटो लावायचा आणि दक्षिणेकडे लाल रंगाचे शास्त्रीय पद्धतीने काढलेले स्वस्तिक लावायचे.

मेष

हा आठवडा समाधानकारक जाईल. संततीची प्रगती चांगली होईल. आपण कुठली नवीन विद्या शिकण्याच्या प्रयत्नात असाल तर यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्मयता आहे. गुऊचे पाठबळ असल्याने जे काम हाती घ्याल ते यशस्वी होण्याची शक्मयता आहे. कोणते तरी चांगले सामाजिक कार्य हाती घ्या. गुऊ अशा कामांना नक्की सहाय्य करतो.

उपाय : दत्ताची उपासना करा.

वृषभ

सांभाळून रहा. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. घराबाहेर पडताना मास्क वापरा. खर्च योग्य ठिकाणी होऊ दे. अपव्यय नको. काहीतरी नुकसान होण्याची शक्मयता आहे. काळजी घ्या. कर्ज मिळवण्याची जर धडपड करत असाल तर आणखी थोड्याशा प्रयत्नाने मिळण्याची शक्मयता आहे. मन कुठल्या तरी चिंतेने अस्वस्थ राहील.

उपाय : हनुमान चालीसाचे पाठ करा.

मिथुन

हा आठवडा आपल्याला छान जाईल. जोडीदाराबरोबर चांगला वेळ जाईल. जर स्वतंत्र व्यवसाय करत असाल तर चांगली प्राप्ती होण्याची शक्मयता आहे. कोर्ट कचेऱ्यातील कुठली छोटी मोठी कामे अडली असतील तर ती सुटण्याची शक्मयता आहे. पण उगीच वादविवादात पडू नका. कुठलीही गोष्ट जास्त ताणून धरू नका. वाहन जपून चालवा.

उपाय: महालक्ष्मीची आराधना करा.

कर्क

मन चंचल होईल. मनाला आवर घाला. धनलाभ होण्याची शक्मयता आहे पण तो योग्य मार्गाने मिळतो की नाही याकडे लक्ष द्या. उगाच कुणाशी पंगा घ्यायला जाऊ नका. सध्या आपला संपूर्ण भारत राममय झाला आहे. त्या रामाशी प्रामाणिक रहा. मनाला इतरत्र कुठे भरकटू देऊ नका. शांत राहण्याचा प्रयत्न करा.

उपाय : शंकराची उपासना करा.

सिंह

सत्संग व तीर्थयात्रेत दिवस जाण्याची शक्मयता आहे. मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग करून घ्या. संत सहवास मिळण्याची शक्मयता आहे. घरातील वृद्धांचा आशीर्वाद मिळेल. तुमच्या हातून काहीतरी विशेष कार्य घडण्याची शक्मयता आहे. काही परोपकार करावासा वाटला तर विचार करत बसू नका. तो करा. आणि आशीर्वाद मिळवा.

उपाय :सूर्याला अर्घ्य द्या.

कन्या

सांभाळून रहा. उद्योगात प्रगती थोडी सावकाश होण्याची शक्यता आहे. नोकरीत असाल तर तुम्ही कष्ट करता आहात पण तुमच्या कष्टाची कुणाला कदर नाही असे तुम्हाला वाटेल आणि मन नाराज होईल. पण काळजी करू नका. जीवनात असे चढ उतार असायचेच. तुमचेही दिवस येतील. तुमच्या कष्टाचे चीज होईल. आणि वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. काळजी घ्या.

उपाय : मन शांत ठेवण्यासाठी नामस्मरण करा.

तूळ

आरोग्य उत्तम राहील. मित्रांच्या आणि भावंडाच्या सहवासात वेळ छान जाईल. द्रव्यलाभाची शक्मयता आहे. आपल्या हातून असे काहीतरी कार्य घडण्याची शक्मयता आहे जेणेकरून समाजात आपला मान वाढेल. आपल्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलेल. हा आठवडा आपल्याला चांगला जाईल.

उपाय : मुक्मया प्राण्यांना खाऊपिऊ घाला.

वृश्चिक

या आठवड्यात आपला खर्च संभवतो. योग्य ठिकाणी व योग्य वेळी खर्च करण्याचा प्रयत्न करा. मन अतिशय चंचल, अस्वस्थ होण्याची शक्मयता आहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. शत्रूपासून नुकसान अगर काहीतरी त्रास होण्याचा संभव आहे. सांभाळून रहा. वाहन सांभाळून चालवा. स्वत:ची काळजी घ्या.

उपाय : गोमातेची पूजा करा.

धनु

मन चंचल होण्याची शक्मयता आहे. स्वभाव तापट होण्याचीदेखील शक्मयता आहे. पण असे करून चालणार नाही. शीघ्रकोपामुळे होणारे कामही होणार नाही हे लक्षात घ्या. आणि सारासार विचार करा. मुलांचा मात्र त्यांच्या काही विशेष कार्यामुळे नावलौकिक वाढण्याची शक्मयता आहे. तो तुमच्यासाठी आनंदाचा क्षण असेल.

उपाय : कुलदेवतेची उपासना करा

मकर

कौटुंबिक सुख या आठवड्यात चांगले मिळेल. कुटुंबासमवेत वेळ आनंदात जाईल. पण आपल्या बोलण्यामुळे कुटुंबातील सदस्य दुखावणार नाहीत ना याकडे जरा लक्ष असू द्या. कारण काही वेळा आपल्या नकळत आपण काही बोलून जातो. त्याचा समोरच्या माणसावर काय परिणाम होईल याचा आपल्याला अंदाज येत नाही. हा आठवडा आपल्याला समाधानाचा जाईल.

उपाय :मुंग्यांना साखर घाला.

कुंभ

हा आठवडा आपल्याला सांभाळून रहायची सूचना देत आहे. नोकर वर्गापासून सावध रहा. धोका होण्याचा संभव आहे. कुणाशीही वादावादी किंवा भांडण करायला जाऊ नका. तशी पाळी आलीच तर एक ते दहा अंक मनात मोजा व शांत राहण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचे धाडस या आठवड्यात करू नका.

उपाय : शनीला तेल घाला.

मीन

वाहन व गृह सौख्य चांगले मिळेल. मातेचा सहवास व प्रेम भरभरून मिळेल. आपण काही नवीन शिकत असाल तर त्यात नक्की यश मिळेल. हा आठवडा आपल्याला खूपच छान जाणार असे दिसते. कदाचित आपण एखादे वाहन किंवा जमीन घेण्याची शक्मयता आहे किंवा आपल्याला धनलाभ होण्याचीसुद्धा शक्मयता नाकारता येत नाही.

उपाय : दु:खिताना मदत करा.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#astro#social media
Next Article