महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राशी भविष्य

06:01 AM Nov 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तुमचे ग्रह आणि तुमचाच अंदाज

Advertisement

भाग 2- रवी ग्रह

Advertisement

दिवाळीनंतर येणारी षष्ठी तिथी उत्तर भारतात, बिहार, मध्य प्रदेश या ठिकाणी छट्टी पूजा म्हणून साजरी करतात. या दिवशी सूर्याला अर्ध्य देणे अत्यंत शुभ असते. जाणून घेऊया तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य चांगला आहे की, त्याला चांगला करावा लागेल. रवी हा ग्रहमालेतील राजा आहे. चराचर सृष्टीला प्रकाश देणारा-  म्हणून आपल्या शरीरातील डोळे आणि बघण्याची शक्ती रवीच्या अंमलाखाली येते.   रवी हा राजा असल्यामुळे सहजरित्या स्वाभिमान आणि अहंपणा आला, ताठपणा आला. म्हणजेच आपल्या शरीरातील पाठीच्या कण्यावर रवीचा अमल आहे.     कुटुंब प्रमुख या नात्याने आपल्या वडिलांना रिप्रेझेंट करणारा तो रवीच ग्रह.   राजा असल्यामुळे मान सन्मान आला. म्हणजेच तुम्हाला समाजात मिळणाऱ्या मान सन्मानाला कारणीभूत असलेला रवी ग्रह आहे. शत्रूंना परास्त करण्याची शक्ती याच्यामध्ये आहे, म्हणून शरीरातील प्रतिकारशक्ती किंवा इम्युनिटी ही रवीच्या अंमलाखाली येते. आजारी पडल्यानंतर आपण जी औषधे घेतो, त्यातील अॅलोपॅथीची औषधे सुद्धा रवीच्या अधिपत्याखाली येतात.

अधिकार गाजवणे, चांगले नोकर चाकर असणे, राजेशाही थाट इत्यादी सगळे  जे तुम्हाला मिळते, ते रवी मुळेच मिळते. मंगळ, गुरु, चंद्र यासारखे रूढी पाळणारे  ग्रह त्याचे मित्र आहेत. राहू आणि केतू रवीला ग्रहण लावतात. तुमच्या कुंडलीमधील रवी बिघडला आहे, हे कसे ओळखावे?, याची लक्षणे सांगतो. जर वारंवार आजारी पडत असाल, वडिलांशी तुमचे अजिबात पटत नसेल, वडिलांकरता तुमच्या मनामध्ये, आदर, प्रेमभाव, धाक नसेल किंवा वडीलही तुमच्याकडे दुर्लक्ष करत असतील, काहीही कारण नसताना तुमच्यावर आळ येत असेल, अचानक  पाठदुखी सारखे आजार त्रास देत असतील, डोळ्यांचे विकार असतील, ‘आपण बोलतो एक आणि समोरचा समजतो दुसरे’, असे होत असेल, मित्रमंडळी कमी असतील किंवा जी असतील, त्यांच्यामध्ये तुमच्याबद्दल जेवढा हवा, तेवढा आदर नसेल, समाजातील लोकांमध्ये तुमच्याविषयी गैरसमज विनाकारण पसरत असतील,  व्यवसाय वारंवार बदलावा लागत असेल, नोकरी, धंद्यामध्ये प्रगती होत नसेल तर, समजावे की, तुमच्या कुंडलीतील रवी/ सूर्य बिघडलेला आहे आणि या ना त्या   प्रकारे त्याची दशा किंवा अंतर्गत अशा चालू आहे. मग यावर उपाय काय करावा, ज्याने तुम्हाला फायदा होईल?, खाली दिलेले उपाय निर्धोक आहेत, कुणीही हे उपाय केले तरी काहीही अपाय होणार नाही, याची खात्री बाळगा.

(1) सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, तुमचे, तुमच्या वडिलांशी असलेले संबंध सुधारले पाहिजेत. सूर्य म्हणजे, तुमचे वडील हे लक्षात घ्या. तुमच्या वडिलांचा तुमच्यावर आशीर्वाद असेल, त्याचे कितीही कसलेही दोष असले तर, ते नाहीसे होतात, हे शंभर टक्के सत्य आहे. शांती, मंत्र, तंत्र करण्यापेक्षा हा उपाय कितीतरी पटीने जास्त फळ देतो, हा अनुभव आहे.

(2) सूर्याच्या प्रकाशात जास्तीत जास्त वेळ घालवल्याने सुद्धा सूर्याच्या अशुभ फळांमध्ये कमी येते (3) सूर्याला अर्घ्य देणे, एका तांब्याच्या भांड्यात लाल मिरचीचे सात दाणे, थोडे कुंकू आणि एक लाल फुल घालून आपल्या डोक्मयाच्या वरून, सूर्याकडे पहात, ते पाणी सोडावे आणि त्या पाण्याच्या धारेतून सूर्याकडे पहावे (4) सूर्याच्या वस्तू दान देणे, तांब्याचे पात्र, गहू, लालचंदन, लाल वस्त्र,   अशा योग्य व्यक्तीला दान दिले पाहिजे की, जी व्यक्ती मध्यम वयाची, उंच,  डोक्यावर केस कमी असलेली किंवा विरळ असलेली आणि गरजू असावी. (5) औषधी स्नान: सूर्याची पीडा दूर करण्याकरता आंघोळीच्या पाण्यात कुंकू, गव्हाचे पीठ,  थेंबभर  मध  हे घालावे. (6) रत्न धारण करणे: काही अति शहाणे लोक  सूर्य खराब असताना माणिक घालण्याचा सल्ला देतात. खरोखर यांच्या बुद्धीची कीव करावी अशी वाटते. जो ग्रह त्रास देतोय, त्याची ताकद वाढवण्याचा हा प्रकार आहे. याकरता माणिक अजिबात धारण न करता, ऊर्जा संस्कार केलेला स्टार ऊबी किंवा तारांकित सूर्यकांतमणी धारण करावा (क्रमश:)

मेष

सणासुदीच्या वातावरणामध्ये एखादी अनामिक हुरहूर सतावू शकते. प्रॉपर्टीच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. धनप्राप्ती कष्टाने साध्य होईल. घरातील वातावरण काहीसे टेन्शन असलेले असेल. प्रवासाला जाणे शक्मयतो टाळा. गुंतवणूक करणाऱ्यांकरता उत्तम कालावधी आहे. या काळात तुमचे लक्ष स्वत:च्या करमणुकीकडे असेल.

उपाय: मुंग्यांना साखर घालावी.

वृषभ

तब्येतीला सांभाळा, असा संदेश देणारा हा आठवडा आहे. कोणतेही दुखणे अंगावर काढू नका. प्रवासाला जायचे योग आहेत. लहान भावा-बहिणीची साथ मिळेल, पण थोडी कुरबूर संभवते. स्थावर मालमत्तेसंबंधी असलेले प्रŽ मार्गी लागायची चिन्हे आहेत. वाहन खरेदीचे योग आहेत. भाग्याची साथ आहे. लांबचा प्रवास संभवतो.

उपाय: तांबूस गाईला चारा घाला.

मिथुन

कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. बाहेरचे खाणे- पिणे शक्मयतो टाळा. तब्येत बिघडू शकते. पैशांच्या बाबतीत काळजी करण्याचे कारण नाही. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. घरातील एखाद्या फंक्शन करता प्रवास करावा लागू शकतो. सोमवारी किंवा मंगळवारी महत्त्वाची बातमी कळेल.

उपाय:  कामगारांना दूध दान द्या

कर्क

आता कुठे तब्येत सुधारत आहे, तेव्हा पथ्य आणि अपत्यय यांच्याकडे लक्ष द्या.   या काळात मन बलवान असेल. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी असेल. धनप्राप्ती उत्तम असल्याने समाधान मिळेल. नोकरदार वर्गाला सांभाळून राहण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनामध्ये थोडा ताण-तणाव अनुभवायला येईल.

उपाय:  तुळशीला दूध मिश्रित पाणी घाला

सिंह  

मुळात स्वाभिमानी स्वभावाचे असल्याने दुसऱ्याचे म्हणणे किंवा बोलणे खपवून घेणार नाही. अहंकारात वाढ होऊ देऊ नका. घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते  किंवा नातलगांची भेट होईल. व्यवसाय वाढवण्याकरता काय करावे, याचा विचार   कराल. प्रॉपर्टी संबंधी असलेले हेवेदावे प्रबळ होतील. गुंतवणूक टाळा.

उपाय:  केशराचा टिळा लावावा

 कन्या

तब्येत सुधारत आहे. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. पैशांच्या बाबतीत सध्या टेन्शन असले तरी पुढच्या सोमवार, मंगळवारी चांगला नफा होण्याची चिन्हे आहेत.   सध्या गुंतवलेल्या पैशातून चांगला परतावा मिळू शकतो, पण सावधपणे गुंतवा.   तुमच्या सद्गुणांचे कौतुक होईल. प्रेम संबंधात मधुरता येईल. नोकरीत टेन्शन असेल.

उपाय:  गाईला गूळ चपाती घालावी

  तूळ

तब्येतीच्या बाबतीमध्ये टेन्शन असेल, पण काही दिवसात ते नाहीसे होईल,  म्हणजे तब्येत सुधारेल. पुढील आठवड्याची सुऊवात पैशांच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल. तुमच्या काम करण्याच्या स्टाईलमध्ये थोडा बदल करावा लागू शकतो.   नवीन प्रॉपर्टीचे योग आहेत. वाहनाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. भाग्य म्हणावे तसे साथ देत नाही, याचा अनुभव येईल.

उपाय: काळे वस्त्र घालू नका.

वृश्चिक 

मधल्या काळामध्ये आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. पण टेन्शन घेण्यासारखे कारण नाही. इन्कम सोर्स वाढवण्याकरता काही लोकांना भेटावे लागेल,   वाटाघाटी होतील. त्या निमित्ताने प्रवास घडू शकतो. प्रॉपर्टीशी काही कामे असल्यास शुक्रवारी, शनिवारी करावीत. गुंतवणूक करायचीच असल्यास पुढच्या आठवड्यात करा.

उपाय:  मुंग्यांच्या वारूळाकडे साखर ठेवावी.

धनु 

आरोग्याच्या कारणामुळे सणांचा आनंद हवा तसा न लुटता आल्याने मन थोडे उदास असू शकते. आर्थिक बाबतीत सगळ्या बाजूने संधी प्राप्त होतील.   कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांशी सुसंवाद घडेल. प्रवासातून नुकसान संभवते.  पुढच्या आठवड्यात प्रॉपर्टीसंबंधी चांगली बातमी कळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा त्रास जाणवेल.

उपाय:  पक्षांकरता दाण्यांची सोय करा

 मकर

‘सर सलामत तो पगडी पचास’, याचा अनुभव येईल. इतरांच्या तुलनेत तुमचे कर्तृत्व ठळकपणे दिसेल. रोजच्या कामापासून ब्र्रेक घेऊन काहीतरी वेगळे कराल.   आर्थिक बाबतीत हात आखडता ठेवावा लागेल. प्रेम संबंधांमध्ये बेबनाव होण्याची शक्मयता आहे. व्यवसायिकांना चांगल्या नफ्या करता योजना राबवाव्या लागतील.

उपाय:  विहिरीत एक चमचा दूध टाकावे

 कुंभ

या येणाऱ्या विकेंडला तब्येतीला सांभाळावे लागेल. आर्थिक आवक उत्तम होत जाईल. स्थावर मालमत्तेसंबंधी काही प्रŽ असतील तर, त्याला योग्य वेळी हाताळावे.  मौजमजेकरता जास्त खर्च होऊ नये, याकडे लक्ष द्या. नोकरदार वर्गाला बोनस किंवा पगारवाढ मिळण्याची शक्मयता आहे. गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील.

उपाय: गरजूला औषध दान द्या

मीन  

आरोग्याकडे लक्ष द्या. कोणत्याही गोष्टीचे अति होऊ देऊ नका. आर्थिक बाजू चांगली असेल. कामाच्या ठिकाणी आपले बोलणे तर्कसंगत असावे, याची काळजी घ्या. धाकट्या भावंडांकरता खर्च करावा लागू शकतो. प्रॉपर्टीसंबंधी वाटाघाटी पुढे ढकलाव्यात. छोट्या गुंतवणुकीकरता उत्तम काळ आहे. नोकरदारांना चांगला फायदा होईल.

उपाय:सुगंधी वस्तू दान द्याव्यात.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article