‘लईकी-लईका’मध्ये राशा थडानी
बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रविना टंडनची कन्या राशा थडानी आणि ‘मुंज्या’ फेम अभिनेता अभय वर्माचा आगामी चित्रपट ‘लईकी-लईका’ चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यानी याचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये राशा आणि अभय दिसून येत आहे. या पोस्टरने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटातील दोघांचा लुक या पोस्टरमुळे सर्वांसमोर आला आहे. पोस्टरला रेट्रो लुक देण्यात आला असून यात स्नीकर शूज परिधान केलेला अभय आणि राशा कपलप्रमाणे दिसून येतात. हा चित्रपट केवळ एक प्रेमकथा नसून यात दोघांच्या संबंधांदरम्यान एखादे धोकादायक वळण येणार असल्याचे संकेत हा पोस्टर देत आहे. सौरभ गुप्ता यांच्याकडून दिग्दर्शित ‘लईकी लईका’मध्ये राशा आणि अभय वर्मा हे मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. दोघेही पहिल्यांदा यानिमित्ताने एकत्र काम करणार आहेत. राशाचा हा चित्रपट चालू वर्षी मे महिन्याच्या आसपास प्रदर्शित होणार असल्याचे समजते.