‘पती, पत्नी और वो 2’मध्ये राशा
मागील काही काळापासून श्रीलीला ही एका हिंदी चित्रपटात दिसून येणार असल्याची चर्चा सुरू आहे. कार्तिक आर्यनसोबत ती काम करणार असल्याचे बोलले जात होते. श्रीलीला आणि कार्तिक हे अनुराग बासू यांच्या एका चित्रपटात एकत्र काम करत आहेत. तर कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरचा चित्रपट ‘पती पत्नी और वो 2’मध्ये तिची वर्णी लागल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु श्रीलीला या चित्रपटात दिसणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दिग्दर्शक मुदस्सर अजीज आणि निर्माते या चित्रपटात राशा थडानीला मुख्य भूमिका देणार आहेत. निर्माते नव्या जोडीचा शोध घेत असून याचमुळे ते राशा थडानीच्या नावाचा विचार करत आहेत.
‘पती पत्नी और वो’ हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनन्या पांडेसोबत कार्तिक आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत होती. कार्तिक आर्यन दिग्दर्शक अनुराग बासू यांचा चित्रपट पूर्ण केल्यावर याच्या सीक्वेलमध्ये काम करणार आहे. ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. चित्रपटात अपारशक्ति खुराना आणि क्रीति सेनॉन सहाय्यक भूमिकेत होते.