स्पेनमध्ये दिसले दुर्लभ रानमांजर
स्पेनच्या जाएन पर्वतीय भागात पहिल्यांदाच पांढऱ्या रंगाचा इबेरियन लिंक्स कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सर्वसाधारणपणे ही रानमांजरासारख्या दिसणारी प्रजाती सोनेरी किंवा करड्या रंगाची असते, परंतु यावेळी दिसलेले दृश्य अत्यंत अनोखे होते.
या दुर्लभ लिंक्सचा व्हिडिओ स्पॅनिश वाइल्डलाइफ फोटोग्राफर एंजेल हिडाल्गोने कॅप्चर केला आहे. वर्षांपासून कॅमेरा लावत होता, अनेकदा प्रयत्न अयशस्वी ठरले, परंतु यावेळी निसर्गाने दिलेले आयुष्यभर आठवणीत राहणार असल्याचे एंजेल यांनी म्हटले आहे. या दुर्लभ इबेरियन लिंक्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. यापूर्वीच जगातील सर्वात दुर्लभ रानमांजरांमध्ये सामील ही प्रजाती दोन दशकांपूर्वी विलुप्तीच्या मार्गावर पोहोचली होती, जेव्हा याची संख्या 100 पेक्षाही कमी राहिली होती.
तज्ञांनुसार या लिंक्सला लियुसिजम नावाची एक दुर्लभ जेनेटिक कंडिशन असून यामुळे शरीराचा रंग फिका पडतो. परंतु अल्बिनो प्राण्यांच्या उलट याचे डोळे आणि शरीर पूर्णपणे सामान्य आहे. म्हणजेच हा पांढऱ्या रंगाचा असूनही पूर्णपणे तंदुरुस्त आहे. एंजेल यांनी या दुर्लभ दृश्याला सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्शनमध्ये छायाचित्रामागील कहाणीही नमूद केली आहे. भूमध्य समुद्राच्या जंगलातील पांढरे भूत, त्याच्या भेटीने सगळी कहाणीच बदलली आहे. काही महिन्यांपूर्वी मी एका नव्या ठिकाणी ट्रॅकिंग सुरू केले होते. एक दिवस कॅमेरा ट्रॅप तपासत असताना असे काहीतरी दिसले ज्यावर विश्वास ठेवणे अवघड होते. त्याचक्षणी स्वत:च्या डोळ्यांनी हे दृश्य पाहिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निश्चय केला. काळ उलटत गेला, परंतु कुठलेच यश मिळाले नाही. मग एकेदिवशी रात्रभर पाऊस पडल्यावर सकाळी नेहमीप्रमाणे जंगलात अचानक दूरवर एक पांढरी आकृती दिली. त्याची पांढऱ्या रंगाची त्वचा आणि चमकणारे डोळे पाहून स्तब्ध झालो. या दुर्लभ रानमांजराला त्याच्या अधिवासान पाहण्याचा क्षण माझ्यासाठी भाग्यशाली होता, असे त्यांनी म्हटले आहे.
2002 मध्ये पूर्ण स्पेनमध्ये 100 पेक्षाही कमी इबेरियन लिंक्स शिल्लक होते. परंतु सातत्याने संवर्धन प्रकल्प, सरकारचे प्रयत्न आणि एनजीओच्या सहकार्यामुळे आता त्यांची संख्या 2000 च्या नजीक पोहोचली आहे.
हा पांढरा लिंक्स माणसाने निसर्गासोबत मिळून काम केल्यास चमत्कार घडू शकतो याचे जिवंत उदाहरण आहे.