Satara : कराड कृषी प्रदर्शनात दुर्मीळ पुंगनूर गाय व बुटके पशुपक्षी ठरले आकर्षण
अडीच फूट उंच पुंगनूर गाय पाहण्यासाठी कराड कृषी प्रदर्शनात गर्दी
कराड : अडीच फूट उंचीची दुर्मीळ 'पुंगनूर' जातीची गाय, दीड ते दोन फूट उंचीचे बुटके बोकड व शेळ्या, तब्बल बारा किलो वजनाचा टर्की कोंबडा तसेच रंगीबेरंगी मोठे विदेशी पोपट हे कराडच्या कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले. रविवारी सुट्टी असल्याने लाखो नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली.
कराड शेती उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद कृषी विभाग व आत्मा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने २० वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन कराड येथील बैलबाजार तळावर सुरू आहे. रविवारी सकाळपासूनच शेतकरी व नागरिकांनी कुटुंबांसह मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. दिवसभर प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची रीघ सुरुच होती.
दीड ते दोन फूट उंचीचे बुटके बोकड, विविध जातीच्या शेळ्या, पर्शियन मांजर, फायटर कोंबडा, ससे, कबुतरे, विविध जातींचे रंगीबेरंगी विदेशी पोपट व आफ्रिकन बर्डस् प्रदर्शनात दाखल झाले आहेत. हे सर्व पशुपक्षी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची कर्मभूमी असलेल्याकराड रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
बालाजीच्या अभिषेकासाठी पुंगनूर गायीच्या दूध, दही, तुपाचा वापरबेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील सर्जेराव शामराव मोहिते यांची प्रदर्शनात सहभागी झालेली अडीच फूट उंचीची 'पुंगनूर जातीची गाय खास आकर्षण ठरत आहे. तिरुपती बालाजी देवस्थानात देवाच्या अभिषेकासाठी या गायीचे दूध, दही व तूप वापरले जाते. एक ते २५ लाख रुपये किंमत असलेली ही गाय दररोज तीन ते पाच लिटर दूध देते. दुधाला प्रतिलिटर ३०० ते ५०० रुपये, तर तुपाला प्रतिकिलो पाच ते दहा हजार रुपये दर मिळतो.
कागल येथील हैदरअली बर्ड ब्रिडिंग फार्मच्या माध्यमातून सादर करण्यात आले आहेत. पक्षी पाहण्यासाठी प्रामुख्याने लहान मुलांची गर्दी होत आहे.करोली (ता. मिरज) येथील स्वराज अॅ ग्रो फार्मच्या स्टॉलवर तब्बल १२ किलो वजनाचा टर्की कोंबडा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. कर्की, चिनी कोंबड्या, इंडियन बदक, राजहंस बदक, गावरान, कडकनाथ, गिरीराज, सातपुडा, सोनाली, कावेरी व ब्लॅक अस्ट्रोलॉप अशा विविध जातींच्या कोंबड्या कोंबडे लक्ष वेधून घेत आहेत.