दुर्लभ कॉटन कँडी लॉबस्टर
10 कोटी वर्षांमध्ये एकदाच होणारी घटना
अमेरिकेच्या न्यूहॅम्पशायरमध्ये मच्छिमार जोसेफ क्रामर हे समुद्रात मासे पकडत असताना तेव्हा त्यांना एका निळ्या रंगाचा लॉब्सटर दिसला. हा लॉब्सटर त्यांच्या जाळ्यात अडकला होता. तसेच तो अत्यंत सुंदर होता. निळ्या रंगाच्या या लॉबस्टरच्या शरीरावर काही रंगाचे डाग देखील आहेत. जोसेफ यांनी यापूर्वी निळ्या रंगाचे लॉबस्टर पकडले आहेत, परंतु अशाप्रकारचा लॉबस्टर त्यांना प्रथमच दिसून आला आहे.
याच्या अनोख्या वैशिष्ट्यामुळे त्यांनी तो सीकोस्ट सायन्स सेंटर येथे नेण्याचा निर्णय घेतला. तेथे तो आता प्रदर्शनार्थ ठेवण्यात आला आहे. हा एक कॉटन कँडी लॉबस्टर असून तो अत्यंत दुर्लभ आहे. हा 10 कोटी वर्षांमध्ये केवळ एकदाच दिसून येत असतो असे तज्ञांकडून सांगण्यात आले.
हा लॉबस्टर अन्य लॉबस्टरप्रमाणे काळ्या, चॉकलेटी रंगाचा नसतो. याच्या रंगामुळे याची शिकार सहजपणे होते. याचमुळे ते सहजपणे दिसून येत नाहीत. यापूर्वी 2018 मध्ये कॅनडाच्या किनाऱ्यावर अधिक सौम्य रंगाचा कॉटन कँडी लॉबस्टर दिसून आला होता.
जो लॉबस्टर सर्वसाधारणपणे करड्या रंगाचा दिसतो, त्याच्या शरीरावर पिवळ्या आणि निळ्या रंगाचे पिगमेंट्स असतात, अनेकदा जेनेटिक म्युटेशनमुळे कुठला तरी एक रंग अधिक प्रभावी असतो, यामुळे उर्वरित रंग पटकन दिसून येत नाहीत.
एक कोटी वर्षांमध्ये एकदाच पूर्णपणे लाल लॉबस्टर दिसून येतो. तर 3 ते 5 कोटी वर्षांमध्ये पूर्णपणे नारिंगी, पिवळा किंवा मिश्र रंगाचे लॉबस्टर दिसून येतात. परंतु कॉटन कँडी लॉबस्टर किंवा अल्बीनो लॉबस्टर 10 कोटी वर्षांमध्ये एकदाच दिसतो.