बांबोळीत एक दिवसाच्या नवजात बाळाला दुर्मिळ गटाचे रक्तदान
आरोस येथील रसिक दळवी या युवकाची तत्परता
ओटवणे | प्रतिनिधी
गोवा बांबोळी रुग्णालयाअवघ्या एक दिवसाच्या नवजात बाळाला तात्काळ दुर्मिळ अशा फ्रेश ओ निगेटिव्ह रक्ताची गरज असल्याचे समजताच ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित रक्तदाते रसिक दळवी (आरोस) यांनी तात्काळ बांबोळी रक्तपेढीत रक्तदान केले. आणि या नवजात बालकाचा जीव वाचवला. त्यामुळे रक्तदाते रसिक दळवी यांच्यासह ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे या बालकाच्या नातेवाईकांनी आभार मानले.या नवजात बालकाला जन्मताच दुर्मिळ अशा दोन फ्रेश ओ निगेटिव्ह रक्त देण्यात आले होते. मात्र तरीही या नवजात बालकाची प्रकृती अत्यंत नाजूक बनल्याने त्या बाळाला तात्काळओ निगेटिव्ह रक्ताची गरज होती. यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन या रक्तपेढीच्या डॉक्टरांनी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित ऑन कॉल रक्तदाते रसिक दळवी (आरोस) यांच्याशी थेट संपर्क साधून रक्तदान करण्याची विनंती केली. त्यानंतररसिक दळवी यांनी याची माहिती ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांना देऊन तात्काळ गोव्यात रवाना झाले. त्यानंतर त्यांनी रक्तदान करीत नवजात बाळाचा जीव वाचविला.ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या असे अनेक रक्तदात्यांप्रमाणेच रसिक दळवी यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ बांबोळी रक्तपेढीत जाऊन रक्तदान करीत नवजात बालकाचा जीव वाचवला. अशा कार्यतत्पर रक्तदात्यांचा संस्थेला सार्थ अभिमान असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी सांगितले.