मुणगे - कारीवणेवाडीत दुर्मिळ ब्लॅक पँथरचे दर्शन
12:44 PM Jan 15, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
प्रतिनिधी
मुणगे
Advertisement
देवगड तालुक्यातील मुणगे येथील कारीवणेवाडी या रस्त्यालगत असलेल्या काजूच्या बागेमध्ये मंगळवार १४ जानेवारी रोजी साडे सहा वाजण्याच्या सुमारास ब्लॅक पँथरचे दर्शन झाले. येथील ग्रामस्थ निषाद परुळेकर, प्रतिक परुळेकर व सचिन परुळेकर हे या रस्त्याने जात असताना त्यांच्या निदर्शनास हा बछडा आला. त्यावेळी प्रतिक परुळेकर यांनी आपल्या मोबाईल मध्ये त्याचे छायाचित्र घेऊन खात्री केली असता तो दुर्मिळ ब्लॅक पँथर असल्याचे समजले. तो साधारण दोन वर्षाचा बछडा असल्याचे प्राणीमित्र यांच्याकडून समजते. मागील चार दिवसापूर्वी हाच बछडा मुणगे आपईवाडी ग्रामस्थ यांच्या निदर्शनास आला होता असे निषाद परुळेकर यांनी सांगितले.
Advertisement
Advertisement
Next Article