दुर्मिळ राखाडी डोके असलेली 'टिटवी' तुम्ही पाहिलीये आहे का?
पूर्वोत्तर चीन आणि जपानमध्ये वास्तव्य असलेला हा पक्षी दरवर्षी स्थलांतर करतो
By : संजय खूळ
इचलकरंजी : कोल्हापूर जिह्यात प्रथमच राखाडी डो वे ढअसले ल्या टिटवी (ग्रे हेडेड लॅपविंग) आढळून आली आहे. इचलकरंजीतील हौशी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पक्षी फोटोग्राफर तज्ञ जगताप, सचिन कवडे आणि रवी वळकुंडे हे पन्हाळा तालुक्यातील मसाई पठार (कोल्हापूर) येथील सातव्या पठारावरील तलावावर फोटोग्राफी करत असताना त्यांना हा पक्षी आढळून आला. पक्षी अभ्यासकांकडून याबाबतची माहिती घेतली असता हा दुर्मिळ पक्षी असल्याचे लक्षात आले.
पूर्वोत्तर चीन आणि जपानमध्ये वास्तव्य असलेला हा पक्षी दरवर्षी स्थलांतर करत असतो. विदर्भात अमरावती, वर्धा जिल्ह्यात तो आढळतो. पक्षी निरीक्षकांच्या अभ्यासानुसार हिवाळ्याच्या काळात हा पक्षी बांग्लादेशपासून मलेशिया, फिलीपाईन्स पूर्व आशियामधील देशांमध्ये स्थलांतर करत असतो. स्थलांतराच्या काळात भारतातील पूर्वोत्तर राज्ये हे या पक्ष्याचे हक्काचे ठिकाण आहे. पण कोल्हापूर जिह्यात मात्र हा पक्षी पहिल्यांदाच आढळला आहे. व्हेनेलस सिनेरिअस हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. हा पक्षी आकाराने साधारणत: टिटवी एवढाच आहे.
मानेपासून डोक्यापर्यंतचा त्याचा रंग राखाडी आहे. चोच, पाय पिवळे असून, चोचीचे टोक काळे आहे. या पक्ष्याच्या छातीवर काळ्या रंगाचा कॉलरसारखा पट्टा असतो. ओल्या गवताळ परिसरात त्याचे वास्तव्य असते. उथळ पाण्यातील कीटक, कृमी हे त्याचे खाद्य असते. अनेक पक्ष्यांच्या अधिवासासाठी कोल्हापूर जिह्यात बरीच ठिकाणे सुरक्षित आहेत. त्याचबरोबर आहार उपलब्ध आहे. त्यामुळे जिह्यात केवळ देशातूनच नव्हे तर परदेशातील अनेक पक्ष्यांचे स्थलांतर जिल्ह्यात होते.
मसाई पठारावर महत्त्वाचा अधिवास
मसाई पठार हे अनेक पक्ष्यांच्या अधिवासासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. या परिसरात आजवर अनेक प्रजातींच्या दुर्मिळ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. राखाडी रंगाचे डोके असलेल्या टिटवीची त्या ठिकाणी नोंद होणे हा अत्यंत दुर्मिळ प्रसंग आहे, अशी प्रतिक्रया पक्षी अभ्यासक बाळकृष्ण वरुटे यांनी दिला