For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Rare Owl | चक्‍क काळम्मावाडीत दिसले दुर्मिळ गव्हाणी घुबड; पाहणारेही झाले अवाक्!

01:16 PM Jun 19, 2026 IST | NEETA POTDAR
rare owl    चक्‍क काळम्मावाडीत दिसले दुर्मिळ गव्हाणी घुबड  पाहणारेही झाले अवाक्
Advertisement

सरवडे (विजय पाटील ) - काळम्मावाडी धरणाच्या जलाशयाच्या परिसरातील झाडावर बसलेल्या दुर्मिळ असणाऱ्या गव्हाणी (शेतघुबडाचे) दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी शांतपणे बसलेले हे पांढरट रंगाचे घुबड अनेकांच्या नजरेत भरले. या परिसरात दिसणाऱ्या अन्य घुबडांपेक्षा वेगळे असल्याने पाहणाऱ्यांना त्याचे आकर्षण वाटले.

Advertisement

    या घुबडाचा हृदयाच्या आकाराचा चेहरा असून पांढरट, तपकिरी शरीरावर काळे ठिपके तसेच गडद काळे डोळे ही वैशिष्ट्ये स्पष्टपणे दिसून येतात. त्यामुळे पक्षीप्रेमींनी हे शेत घुबड प्रजातीतील असल्याचे सांगितले.  पर्यावरणासाठी उपयुक्त असणारे हे  घुबड  उंदीर, सरडे यांसारख्या प्राण्यांवर उपजीविका करत असल्याने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त  मानले जाते. त्यामुळे त्याचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे पर्यावरण  प्रेमींचे मत आहे.

   निशाचर जीवनशैलीतील हे घुबड प्रामुख्याने रात्री सक्रिय असते. दिवसा झाडांवर किंवा एकांत ठिकाणी विश्रांती घेताना ते दिसून येते.  काही ठिकाणी घुबडांविषयी गैरसमज आढळतात; मात्र तज्ज्ञांच्या मते, घुबड मानवासाठी निरुपद्रवी असून पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्याच्या विषयी गैरसमज न बाळगता त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. या अनोख्या गव्हाणी घुबडाच्या दर्शनामुळे कांहीं नागरिकांनी उत्सुकतेने फोटो काढत निसर्गाचा हा सुंदर क्षण अनुभवला.

Advertisement

      परिसरात प्रथमच दर्शन
काळम्मावाडी धरणाच्या जलाशयाच्या बाजूला बुधवारी रात्री रस्त्यावरुन फेरफटका मारत असताना आठच्या सुमारास एका झाडावर एक पक्षी बसल्याचे दिसून आले. बॅटरीचा प्रकाशझोत टाकल्यानंतर वेगळ्या प्रकारचे घुबड दिसून आले. प्रथमच अशा जातीचे घुबड दिसल्याने उत्सुकतेने तात्काळ मोबाईलमध्ये छायाचित्रे घेतली. बराच वेळ शांत बसून होते. त्याला त्रास होवू म्हणून लागलीच निघून आलो.( सुनील मोरेसंचालक - निरालय रिसाॅर्ट‌‌‌ मांजरखिंड )
                    

Advertisement
Tags :

.