90 वर्षांनंतर पुन्हा आढळला दुर्मीळ प्राणी
जवळपास 9 दशकांपासून वैज्ञानिक नोंदींमध्ये आढळून न आलेला दुर्मीळ ‘बांग्का स्लो लॉरिस’ हा प्रायमेट प्राणी पुन्हा आढळला आहे. इंडोनेशियातील बांग्का बेटावर या प्रजातीचे 90 हून अधिक प्राणी आढळून आले असून त्यापैकी 86 प्राण्यांवर उपचार करून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. या शोधामुळे नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रजातीच्या संवर्धनासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.
1930 नंतर प्रथमच वैज्ञानिक नोंदीत
बांग्का स्लो लॉरिसचा शेवटचा ऐतिहासिक वैज्ञानिक उल्लेख 1930-1932 या कालावधीतील असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे. त्यामुळे ही प्रजाती नामशेष झाली असावी, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, इंडोनेशियातील अलोबी वन्यजीव बचाव केंद्राने 2015-25 या 10 वर्षांच्या कालावधीत या प्राण्याहंच्या 90 हून अधिक नोंदी केल्या, नव्या वैज्ञानिक अभ्यासामुळे या प्रजातीचे अस्तित्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
मोठे डोळे, लालसर-तपकिरी केस
बांग्का स्लो लॉरिस हा आकाराने लहान, झाडांवर राहणारा आणि प्रामुख्याने रात्री सक्रीय असणारा प्राणी आहे. त्याच्या शरीरावर लालसर-तपकिरी केस, मोठे गोल डोळे आणि चेहऱ्यावर वैशिष्ट्यापूर्ण खुणा असतात. तो झाडांच्या फांद्यांवर अत्यंत सावकाश हालचाल करतो. हा प्राणी माकड किंवा लीमर नसून प्रायमेट्सच्या वेगळ्या गटातील सदस्य आहे. त्याचे शास्त्राrय नाव नायटाइसब बॅनकॅनस आहे.
रात्री सक्रीय, दिवसा झाडांवर विश्रांती
बांग्का स्लो लॉरिस हा निशाचर प्राणी असल्याने तो प्रामुख्याने रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतो. दिवसा झाडांच्या दाट पानांमध्ये किंवा सुरक्षित फांद्यांवर विश्रांती घेतो. त्याची हालचाल संथ असली, तरीही झाडांच्या फांद्यांवर पकड मजबूत असल्यामुळे तो सहजपणे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाऊ शकतो. कीकट, झाडांचा डिंक, फळे आणि इतर लहान जीव हे त्याच्या आहाराचे घटक आहेत.
चाव्यात अत्यंत विषारी द्रव्य
या प्राण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे त्याचा विषारी चावा. त्याच्या हाताच्या आतील बाजूस कोपराजवळ असलेल्या विशेष ग्रंथींमधून स्त्रवणारे द्रव्य तो लाळेत मिसळतो, चावा घेतल्यास हे विषारी मिश्रण शरीरात प्रवेश करु शकते. त्यामुळे माणसाला तीव्र अॅलर्जी होऊ शकते. काही प्रकरणात ही प्रतिक्रिया जीवघेणी ठरण्याचीही शक्यता असते. त्यामुळे हा प्राणी दिसल्यास त्याला हाताळण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये. या प्राण्याला हाताळताना वन्यजीव कर्मचारी देखील विशेष खबरदारी घेत असतात.
जंगलतोड अन् खाणकामाचा वाढता धोका
बांग्का बेटावर जंगलांचा ऱ्हास हा या प्रजातीसमोरील मोठा धोका आहे. कथील धातूच्या खाणकामासाठी जंगलांचा नाश तसेच पाम लागवडीसाठी जमिनीची साफसफाई यामुळे या प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास कमी होत आहे. याशिवाय रस्ते, वीजवाहिन्या आणि बेकायदा वन्यजीव व्यापारामुळेही त्यांना धोका निर्माण झाला