For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांद्यात ३१ माकडे पकडण्यात वनविभागाच्या जलद कृती दलाला यश

11:15 AM Dec 29, 2024 IST | अनुजा कुडतरकर
बांद्यात ३१ माकडे पकडण्यात वनविभागाच्या जलद कृती दलाला यश
Advertisement

शिवसेना ठाकरे गटाचे ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांचे बांदा वासियांनी मानले आभार

Advertisement

प्रतिनिधी
बांदा

वनविभागाच्या जलद कृती दलामार्फत बांदा शहरातील आंगडीवाडी येथे ३१ माकडे पकडण्यात आली. माकडांपासून शेती बागायतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी उपवनसंरक्षक नंदकुमार रेड्डी यांना शहरातील माकडांचा बंदोबस्त करणेबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार हि माकड पकड मोहीम राबविण्यात आली. शहरात दोन दिवस माकड पकड मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री. काणेकर यांनी दिली.

Advertisement

शुक्रवार व शनिवारी दिवसभर ग्रामस्थांच्या मागणीनुसार शहरात माकड पकड मोहीम  राबविण्यात आली. आंगडीवाडी येथील ३१ माकडांना वनविभागाच्या जलद कृती दलाने जेरबंद केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, बांदा वनपाल प्रमोद सावंत यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन वन खात्याच्या पथकाचे आभार व्यक्त केले.

शहरात माकडांचा उपद्रव वाढला असून ज्या शेतकऱ्यांच्या शेती बागायतीत माकडांचा सातत्याने वावर आहे  त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन साईप्रसाद काणेकर यांनी केले आहे. बांदा वासि्यांनी साईप्रसाद काणेकर व सहकाऱ्यांचे मोहीम राबविल्या बद्दल आभार व्यक्त केले. या कृती दलात बबन रेडकर, प्रथमेश गावडे, शुभम कळसुलकर, राकेश आमरुसकर, पुंडलीक राऊळ व गोपाळ सावंत यांचा समावेश होता.

Advertisement
Tags :

.