ग्रामीण भागातही जलद कृती दलाचे पथसंचलन
12:32 PM Sep 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेळगाव शहरापाठोपाठ तालुक्यातील वेगवेगळ्या गावातही पोलिसांचे पथसंचलन सुरू आहे. काकती व बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या गावात पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनात जलद कृती दलाच्या जवानांबरोबरच स्थानिक अधिकारी व पोलीसही सहभागी झाले होते. काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील आंबेवाडी, कडोली, कंग्राळी बुद्रुक आदी गावात तर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील मच्छे, पिरनवाडी येथे पथसंचलन झाले. गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी बेळगाव शहरातील मिरवणूक मार्ग, विविध उपनगरांसह आता ग्रामीण भागातही पोलिसांचे पथसंचलन सुरू आहे. श्री विसर्जन मिरवणूक केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी जोरात तयारी केली आहे.
Advertisement
Advertisement