दहावीतील मुलीवर बलात्कार, आरोपी निर्दोष
दापोली :
दहावीत शिकणाऱ्या मुलीवर ३५ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची घटना लॉकडाऊन काळात डिसेंबर २०२० मध्ये घडली होती. या बाबत खेड येथील सत्र न्यायालयाने आरोपीची नुकतीच निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने दापोलीतील विधीज्ञ महेंद्र बांद्रे यांनी काम पाहिले.
अडखळ येथील आरोपी राजेश मळेकरने दहावीतील मुलीशी तिच्या इच्छेविरुद्ध लॉकडाऊन काळात वारंवार शरीरसंबंध ठेवले. यातून ती गरोदर होऊन तिला अपत्य प्राप्तीही झाली. यानंतर तिच्या आईने दापोली पोलीस ठाणेत राजेश मळेकर याच्याविरोधात तक्रार दाखल केली. दापोली पोलिसांनी भादंवि ३७६ अन्वये राजेश मळेकरवर गुन्हा दाखल केला. यानंतर ही मुलगी अल्पवयीन असल्याचे गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांनी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार सिद्ध झाल्याने राजेश मळेकरवर पॉक्सोंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला. या खटल्याचे काम खेड येथील सत्र न्यायालयात चालले. न्यायालयाने या प्रकरणी एकूण १४ साक्षीदार तपासले.