For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बलात्कार, धर्मांतर रॅकेट उघडकीस

06:08 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
बलात्कार  धर्मांतर रॅकेट उघडकीस
Advertisement

भोपाळमध्ये दोन बहिणींना अटक, अनेक प्रकरणे

Advertisement

वृत्तसंस्था / भोपाळ

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे एका बलात्कार आणि धर्मांतराच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हे रॅकेट चालविणाऱ्या आफ्रिन आणि अमरीन या बहिणींना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये अन्य अनेकांचा सहभाग असल्याची माहिती उघड झाली असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

Advertisement

या प्रकरणी दोन हिंदू महिलांनी तक्रार सादर केल्यामुळे पोलीसांनी कार्यवाहीला प्रारंभ केला, या महिलांपैकी एक छत्तीसगडची असून एक भोपाळमधीलच आहे. या महिलांना प्रथम नोकरीचे आमिष दाखवून जाळ्यात ओढण्यात आले. त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्यांच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला आणि नंतर त्यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. हा प्रकार असह्या झाल्याने या महिलांनी पोलिसांकडे तक्रार सादर केल्यामुळे कारवाई झाली.

अनेक प्रकरणे उघडकीस

आफ्रिन आणि अमरीन या बहिणी, तसेच त्यांचे पुरुष सहकारी यांनी अशा प्रकारे अनेक हिंदू महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचे आतापर्यंतच्या तपासणीतून उघड झाले आहे. तक्रार सादर करणाऱ्या एका महिलेवर अमरीन या आरोपी महिलेचा भाऊ बिलाल याने बलात्कार केला, असे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अन्य युवतीला आरोपी बहिणींनी काही व्यक्तीगत कमासाठी अहमदाबाद येथे नेले आणि तेथे यासीर नामक युवकाने तिच्यावर बलात्कार केला, अशीही माहिती तक्रारींमधून उघड झाली आहे. या लैंगिक शोषणाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले आणि त्याच्या आधारावर या महिलांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्यावर धर्मांतर करण्यासाठीही दबाव टाकण्यात आला. या रॅकेटची पाळेमुळे अन्य राज्यांमध्येही पसरली असल्याचा संशय आहे. बलात्कार करण्यापूर्वी या महिलांना सक्तीने अंमली पदार्थ दिले जात असत, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस या सर्व प्रकरणांचा तपास करीत आहेत.

आरोपीच्या मोलकरणीचीही तक्रार

आरोपी अमरीन हिच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीनेही लैंगिक शोषण झाल्याची तक्रार सादर केली आहे. तिनेही अंमली पदार्थांचे सेवन करावयास लावून बलात्कार झाल्याची आणि नंतर धर्मांतराची सक्ती करण्यात आल्याची व्यथा तक्रारीत नमूद केली आहे. या सर्व घडामोडींवरुन हे रॅकेट अत्यंत व्यापक असावे, असे पोलिसांचे अनुमान असून त्यादिशेने तपासकार्य हाती घेण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.