महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रावसाहेब वागळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश

10:42 AM Sep 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : नुकत्याच इटगी येथे झालेल्या पदवीपूर्व महाविद्यालयीन तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत लोकमान्य सोसायटी संचालित रावसाहेब वागळे कॉलेजने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन घडविले. सांघिक क्रीडा प्रकारात मुलांच्या व्हॉलिबॉल संघाने प्रथम क्रमांक, कबड्डी संघाने द्वितीय क्रमांक आणि खो-खो संघाने तृतीय क्रमांक पटकावला. वैयक्तिक क्रीडा प्रकारात मुलींमधून स्वाती घाडी लांबउडी प्रथम, मुलींच्या खो-खो संघातून रेणुका तोरगल, शारदा गावडा यांची जिल्हापातळीवर निवड झाली. मुलांमधून श्रीनाथ कुऱ्हाडे गोळाफेक प्रथम, प्रशांत वाणी 5 हजार मी. धावणे द्वितीय, जोतिबा पाटील 800 मी. धावणे द्वितीय, श्रीनाथ कुऱ्हाडेने 800 मी. धावणे तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्राचार्या शरयू कदम, क्रीडा प्रशिक्षक प्रा. शंकर गावडा, प्रा. संदीप पाटील, प्रा. डी. व्ही. पाटील, प्रा. गुंडू कोडला यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article