For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तायक्वांदोमध्ये राव अकादमीचे घवघवीत यश

11:07 AM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
तायक्वांदोमध्ये राव अकादमीचे घवघवीत यश
Advertisement

बेळगाव : उडुपी जिल्हा तायक्वांदो असोसिएशनने करावळी तायक्वांदो स्पर्धेत दुसऱ्या कर्नाटक ऑलिम्पिकअसोसिएशन आणि इंडिया तायक्वांदोशी संलग्न असलेल्या कर्नाटक तायक्वांदोने आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत राव अकादमीच्या खेळाडूनी यश संपादन केले. अजरकड उडुपी येथील महात्मा गांधी जिल्हा स्टेडियम येथे या स्पर्धेला कर्नाटकातील विविध जिह्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 350 हून अधिक तायक्वांदो खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. बेळगाव जिह्याचे प्रतिनिधित्व करत राव युवा अकादमीच्या खेळाडूंनी शिस्त, चिकाटी आणि आत्म्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत 27 पदके पटकावून जिह्याची शान वाढवली आहे.

Advertisement

सब-ज्युनियर मुलांच्या वयोगटात,  50 किलोखालील वजन गटात घगन शिवपुजीमठ, वेदांत  खडबडी, 25 किलोखालील वजनात सिद्धार्थगौडा गौरी, 27 किलोखालील वजनात मोहम्मदसोहेब  चाँदशाह, 32 किलोखालील वजनात, ईशान पाटील 21 किलोखालील वजनात तक्श गबसावळगीने सुवर्णपदक पटकावले. श्रेयसगौडा गौरी 25 किलोखालील वजनात, स्मिथ  नवखंडकर 21 किलोखालील वजनात, अद्वित गोंड 23 किलोखालील वजनात, दीप  पाटीलला 50 किलोखालील वजनात रौप्यपदक मिळाले तर हर्ष वैष्णव 32 किलोखालील वजनात, शौर्य पोटे 41 किलोखालील वजनात कांस्यपदक मिळविले.

सब- ज्युनियर मुलींच्या वयोगटात श्राव्या शानभाग 35 किलोखालील वजनात, सान्वी पाटील 35 किलोखालील वजनात, निर्वी गाबसवलगी 41 किलोखालील वजनात, सान्वी पोतदार 20 किलोखालील वजनात यांनी सुवर्णपदक पटकाविले आणि स्फूर्ती तालुकार 29 किलोखालील वजनात, अनिका मुनवळ्ळी 35 किलोखालील वजनात रौप्यपदक मिळवले तसेच स्तुती टूमरी 47 किलोखालील वजनात, सान्वी अणवेकर 47 किलोखालील वजनात, मश्विनी प्रजापती 41 किलोखालील वजनात, झारा पिरजादे 29 किलोखालील वजनात, अनन्या लोहार 18 किलोखालील वजनात कांस्यपदक मिळवले.

Advertisement

कॅडेट मुलांच्या वयोगटात मोहम्मद शाफी  चांदशाहा 51 किलोखालील वजनात, आरुष टूमरी 61 किलोखालील वजनात सुवर्णपदक जिंकले तसेच प्रज्वल गूडसने 35 किलोखालील वजनात रौप्यपदक प्राप्त केले. कॅडेट मुलींत मानवी पाटोलेने 32 किलोखालील वजनात सुवर्णपदक पटकावले.तायक्वांदो प्रशिक्षक,  श्रीपाद आर राव यांचे त्यांना मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement
Tags :

.