रणवीर अलाहाबादियाला 'त्या' प्रकरणी अटकेपासून संरक्षण
सुप्रीम कोर्टाचा निर्णय
दिल्ली
'इंडियाज् गॉट लेटंट' या शो मध्ये केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी युट्युबर रणवीर अलाहबादियाविरोधात अनेक एफआयआर दाखल झालेले आहेत. याप्रकरमी रणवीरने सुप्रिम कोर्टात ताबडतोब धाव घेतली. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं आता रणवीर अलाहबादियाच्या अटकेच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच रणवीर अलाहबादियाने सुप्रिम कोर्टात धाव घेत, या प्रकरणी तातडीने सुनावणीची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायलयात रणवीर अलहाबादियाच्या वतीने वकील डॉ. अभिनव चंद्रचू़ड यांनी बाजू मांडली.
दरम्यान, सुरुवातीला रणवीर अलाहबादियाने सर्वोच्च न्यायालयात तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती केली. परंतु त्यावेळी सरन्यायधीश संजीव खन्ना म्हणाले, की या प्रकरणी वेळ घेऊन योग्यवेळी सुनावणी होईल. त्यानंतर त्यांनी सुनावणीसाठी तारीख दिली. दरम्यान रणवीर विरोधात महाराष्ट्रासह आसाममध्ये अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्या. या अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी त्याने लगेचच सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.