For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धैर्यशील माने यांना निवडून आणण्याचा रणरागिणींचा निर्धार

03:29 PM Apr 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
धैर्यशील माने यांना निवडून आणण्याचा रणरागिणींचा निर्धार
Advertisement

खासदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत नृसिंहवाडी येथे महिलांचा मेळावा
नृसिंहवाडी प्रतिनिधी
केंद्रशासनाने माहिलांसाठी विविध नाविन्य पूर्ण योजना राबविल्या आहेत ज्यामुळे माहिलांचे जीवनमान आणि आर्थिक स्तर उंचावला आहे . खा धैर्यशील माने यांनीही या मतदारसंघात महिलांसाठी विविध योजना व त्यासाठी निधि खेचून आणून महिलाना समाजांत सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत . त्यामुळे महिलांच्या प्रगतिसाठी नेहमीच पाठीशी राहण्राया धैर्यशील माने यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन पुण्याच्या बहुचर्चित खासदार सौ. मेधा कुलकर्णी यांनी केले . शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आयोजित महिला मेळांव्यात त्या बोलत होत्या . त्यानंतर त्यांनी इचलकरंजीत निरनिराळ्या ठिकाणी भेटी दिल्या. देशाचे भवितव्य घडविण्यासाठी व मतदारसंघाचा विकास गतीशील करण्यांसाठी धैर्यशील मानेच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.

Advertisement

निवेदिता माने म्हणाल्या, ग्रामीण भागांतील महिला स्वत?च्या पायावर उभ्या रहात्यांत यासाठी केंद्र व राज्य शासनाने बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत पोहचवली आहे. महिलांना एस टी प्रवासांत 50 टक्के सवलत दिली आहे. महिलांना सक्षम करण्यांसाठी कटिबद्ध असलेल्या धैर्यशील मानेंना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले .

यावेळी संघटक नीता केळकर यांनी मनोगत व्यक्त केले.त्यांच्या सोबत भाजपा जिल्हा महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ.रमा फाटक, जिल्हाध्यक्षा पुष्पा पाटील , नूतनकुमारी , वर्षा पाटील , तेजस्विनी पाटील , डॉ.नीता माने , स्वाती पाटील , महादेवी बिराजदार , रागिणी शर्मा, जिल्हा उपाध्यक्षा अंजुम जमादार,माधवी पाटील आदी उपस्थित होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.