For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑलिम्पिक टेटेसाठी क्रमवारी जाहीर

06:18 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑलिम्पिक टेटेसाठी क्रमवारी जाहीर
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पॅरिस ऑलिम्पिकमधील टेबल टेनिस स्पर्धेत श्रीजा अकुला (16 वे) आणि मनिका बात्रा (18 वे) या सर्वेच्च मानांकित भारतीय खेळाडू असून आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाने ही मानांकने जाहीर केली आहेत. पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी 67 खेळाडूंना मानांकने देण्यात आलेली असून दोन्ही गटांतील सांघिक प्रकारांत 16 संघांना मानांकने बहाल करण्यात आली आहेत. गेल्या महिन्यात श्रीजा अकुलाने जागतिक क्रमवारीत 24 वे स्थान प्राप्त केले होते. हे तिने कारकिर्दीत मिळविलेले सर्वोच्च स्थान आहे. त्याच्या जोरावर तिने महिलांच्या एकेरीतील सर्वोच्च स्थान प्राप्त केलेली खेळाडू म्हणून मनिका बात्राला मिळालेले स्थान हिरावून घेतले होते. 25 वर्षीय श्रीजा ही दोन वेळची राष्ट्रीय विजेती असून जूनमध्ये लागोस येथे ती डब्ल्यूटीटी कंटेन्डर एकेरी किताब जिंकणारी पहिली भारतीय टेबल टेनिसपटू बनली होती. त्याशिवाय तिने अर्चना कामतसमवेत दुहेरीतील किताबही जिंकला होता.

जागतिक क्रमवारीत 28 व्या स्थानावर असलेली मनिका बात्रा तिच्यापेक्षा दोन मानांकने खाली आहे. माजी राष्ट्रकुल विजेती असलेल्या मनिकाने मे महिन्यात सौदी स्मॅशच्या महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. डब्ल्यूटीटी ग्रँड स्मॅश स्पर्धेत शेवटच्या आठ खेळाडूंत पोहोचणारी ती पहिली भारतीय एकेरी टेबल टेनिसपटू बनली होती. दुसरीकडे, दोन वेळच्या राष्ट्रकुल खेळांतील पुरुष एकेरीतील विजेत्या शरथ कमलला 24 वे मानांकन मिळालेले असून तो पाचव्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास सज्ज झाला आहे. 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिक खेळांत तिसऱ्या फेरीत त्याचे आव्हान संपुष्ठात आले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.