रंकाळा स्टँड - टॉवर सायंकाळी 'वन वे'
कोल्हापूर :
रंकाळा टॉवर रंकाळा चौपाटी परिसरात रोज होण्राया वाहतूक समस्येवरचा प्रायोगिक तत्त्वावरचा उपाय म्हणून रंकाळा एसटी स्टँड ते रंकाळा टॉवर हा मार्ग अवजड वाहनांसाठी वनवे करण्यात आला आहे .सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेसाठी हा बदल असणार आहे . 17 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीसाठी हा बदल असेल .
रंकाळा स्टॅन्ड ते रंकाळा टॉवर हा मार्ग सरळ टॉवर कडे न जाता साकोली कॉर्नर मार्गे सर्व वाहने ताराबाई रोडने रंकाळा टॉवर कडे जातील . तसेच शालिनी पॅलेस ते रंकाळा टॉवर या मार्गावरील वाहने शालिनी पॅलेसच्या पिछाडीस असलेल्या रस्त्याने क्रशर चौक व तेथून पुढे ती टॉवर कडे किंवा सोयीच्या रस्त्याने जातील .
या संदर्भातील जाहीरनामा आज जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी जाहीर केला . या जाहीरनाम्यानुसार या मार्गावर पार्किंग बद्दलही नवीन आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार डी मार्ट ते रंकाळा टॉवर ,खराडे महाविद्यालय ते जॉकी बिल्डिंग, कृष्णा मेडिकल ते रंकाळा टॉवर व रंकाळा टॉवर ते साकोली कॉर्नर हे रस्ते दोन्ही बाजूने नो पार्किंग झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
- जाहीरनाम्यातील ठळक बदल
रंकाळा स्टॅन्ड ते रंकाळा टॉवर सायंकाळी पाच ते रात्री नऊ वनवे.
शालिनी पॅलेस ते रंकाळा टॉवर सायंकाळी पाच ते रात्री नऊ वनवे .
जावळाचा गणपती ते रंकाळा टॉवर त्या त्या परिस्थितीनुसार पर्यायी मार्ग.
हे सर्व बदल प्रायोगिक तत्त्वावर सत्र या 17 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत राहतील.