For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : कोल्हापूर पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरतोय रंकाळा तलाव

01:51 PM Dec 28, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कोल्हापूर पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरतोय रंकाळा तलाव
Advertisement

                                           पर्यटकांनी बहरला रंकाळा तलाव..!

Advertisement

कोल्हापूर : ख्रिसमसच्या सुट्ट्यानंतर जोडून आलेल्या शनिवार-रविवारमुळे कोल्हापूर शहर पर्यटकांनी फुलून गेले आहे. विशेषतः शहराचे वैभव असलेला रंकाळा तलाव परिसर पर्यटकांच्या गर्दीने गजबजला आहे. रंकाळा टॉवरपासून ते रंकाळा चौपाटीपर्यंतचा संपूर्ण परिसर पर्यटकांनी बहरून गेलेला दिसत आहे. शालेय सहलीसाठी आलेले विद्यार्थीडी आवर्जून रंकाळा तलावाला भेट देत आहेत. सायंकाळी रंकाळा तलावाला जत्रेचे स्वरूप येत आहे.

रंकाळा तलावाला पसंतीकोल्हापुरात आल्यानंतर रंकाळा तलाव पर्यटकांच्या पसंतीस उत्तरत आहे. अंबाबाईचे दर्शन घेतल्यार पर्यटकांची पावले आपुसकच रंकाळा तलावाकडे वळत आहेत. याठिकाणी बोटिंगचा आनंद घेताना दिसत आहेत.

Advertisement

रंकाळा तलाव हा कोल्हापूरचा प्रमुख पर्यटन स्थळ असून, अंबाबाई मंदिरानंतर दुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय स्पॉट मानला जातो. छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला हा तलाव, शालिनी पॅलेसच्या पार्श्वभूमीवर आणि चौपाटीच्या रंगीत वातावरणामुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो.सलग सुट्ट्यांमुळे पुणे, मुंबई, नाशिकसह आसपासच्या भागातून पर्यटक कोल्हापूरला येत आहेत. रंकाळा तलावाला आवर्जुन भेट देऊन ते बोटिंग, चौपाटीवर स्ट्रीटफूड आणि संध्याकाळी फिरण्याचा आनंद घेत आहेत. उद्याने आणि तलावकाठच्या पदपथांवरही गर्दी दिसते.

पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील हॉटेल्स आणि लॉजिंग्स 'हाऊसफुल्ल झाली आहेत. तसेच वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने रंकाळा परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला असला तरी पार्किंगची समस्या जाणवत आहे. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज रंकाळा तलावाच्या पदपथ उद्यानातील खेळणी, आसन व्यवस्था, प्राण्यांच्या प्रतिकृतींची मोडतोड झाली आहे. त्यामुळे बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे. तसेच रंकाळा तलावात प्लास्टिक कचरा व सांडपाण्यामुळे प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे रंकाळ्यच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Advertisement
Tags :

.