For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रणजी : जम्मू-काश्मीरचा धावांचा डोंगर

06:48 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
रणजी   जम्मू काश्मीरचा धावांचा डोंगर
Advertisement

6 बाद 527 धावांची मजल, प्रसिद्ध कृष्णा वगळता कर्नाटकचे गोलंदाज प्रभावहीन, कर्णधार पारस डोगराचे अर्धशतक

Advertisement

वृत्तसंस्था/ हुबळी

कर्णधार पारस डोगराने 70 धावा केल्या, पण कर्नाटकचा बदली खेळाडू के. व्ही. अनिश याला जाणूनबुजून डोक्याने धडक देण्याच्या प्रकाराने जम्मू-काश्मीरच्या फलंदाजीच्या कामगिरीला झाकोळून टाकले. रणजी ट्रॉफी फायनलच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा त्यांनी 6 बाद 527 धावा केल्या होत्या.

Advertisement

डोगरा, यष्टीरक्षक फलंदाज कन्हैया वाधवान (70), साहिल लोत्रा (नाबाद 57) यांनी चांगले योगदान दिले. कर्नाटकच्या गोलंदाजांसाठी हा दिवस खूपच कठीण राहिला, केवळ प्रसिद्ध कृष्णा (29 षटकांत 90 धावांत 3 बळी) याचा त्याला अपवाद राहिला. तथापि, रणजीचे 21 हंगाम खेळलेल्या डोगराच्या उद्धट वागण्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. प्रसिद्धला चौकार मारल्यानंतर सिली पॉइंटवर क्षेत्ररक्षक अनीशला डोक्याने धडक देताना तो कॅमेऱ्यात कैद झाला.

अनीशच्या शब्दांमुळे हा स्थानिक दिग्गज खेळाडू दुखावला गेला की काय हे स्पष्ट झालेले नाही. त्याने अनीशचा सामना केला आणि अनीशच्या हेल्मेटवर धडक दिली. यामुळे त्याचा वरिष्ठ सहकारी मयंक अग्रवाल धावत येऊन दोघांमध्ये उभा राहिला. मैदानावरील पंच रोहन पंडित आणि उल्हास गंधे यांनी योग्यरीत्या हस्तक्षेप केला तेव्हा अग्रवालची डोगराशी शाब्दिक बाचाबाची होताना दिसली. काही वेळाने कर्नाटकचा कर्णधार देवदत्त पडिक्कल देखील पंचांशी बोलताना डोगराबद्दल तक्रार करताना दिसला. डोगराला आता बीसीसीआय सामनाधिकारी नारायण कुट्टी यांच्याकडून दंडांना सामोरे जावे लागेल.

कर्नाटकसाठी दिवसाची सुऊवात चांगली झाली. नाबाद असलेला शतकवीर शुभम पुंडिर (247 चेंडूंत 121 धावा) लवकर बाद झाला. मध्यमगती गोलंदाज विद्याधर पाटील (1/104) याला पुंडिरने मारलेला फटका थेट बदली खेळाडू अनीशच्या हातात गेला आणि 124 धावांची चांगली भागीदारी संपुष्टात आली. पुंडिरच्या डावात 12 चौकार आणि दोन षटकार होते. पहिल्या दिवशी अर्धशतक पूर्ण करणाऱ्या अब्दुल समदच्या (61) बॅटची कड प्रसिद्धचा एक चेंडू घेऊन गेला. जम्मू-काश्मीरच्या 4 बाद 307 धावा झालेल्या असताना कर्नाटकला त्यांचा डाव लवकर संपुष्टात आणण्याची आशा दिसू लागली होती. पण त्याचवेळी अनुभवी डोगरा आणि जम्मू-काश्मीरचा हंगामातील सर्वोत्तम खेळाडू वाधवान यांनी एकत्र येऊन 32 षटकांत 110 धावा जोडल्या.

तिखट जलद गोलंदाजी करणाऱ्या प्रसिद्धला डोगरा आणि वाधवान यांनी स्क्वेअरच्या मागील भागातून काही चौकार लगावले. तथापि, त्यांनी भारतीय कसोटी वेगवान गोलंदाजाला बळी मिळवू न देता खूप संयम दाखवला. त्यांनी वेगाने धावा काढल्या नाहीत, पण लेगस्पिनर श्रेयस गोपाल (33 षटकांत 1/130) आणि डावखुरा फिरकी गोलंदाज शिखर शेट्टी (32 षटकांत 1/112) हे गोलंदाजी करत असताना या दोघांना स्ट्राईक फिरविण्यात अडचण आली नाही.

डोगराच्या 166 चेंडूंच्या खेळीत आठ चौकार, तर वाधवानच्या 109 चेंडूंच्या खेळीत नऊ चौकारांचा समावेश राहिला. शेट्टीच्या चेंडूवर स्लिपमध्ये वाधवानला के. एल. राहुलने झेलबाद केल्यानंतर डोगराने लोत्रासह आणखी 54 धावा जोडल्या लोत्रानेही स्वत:चे अर्धशतक पूर्ण केले. तिसरा नवीन चेंडू घेण्यास चार षटके शिल्लक असताना कर्नाटकचे गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांची एकूण धावसंख्या 600 च्या खाली ठेवू पाहतील आणि त्यांची माजी आणि सध्याच्या कसोटी खेळाडूंनी भरलेली फलंदाजी प्रभावी कामगिरी करेल अशी आशा संघ व्यवस्थापन बाळगेल.

संक्षिप्त धावसंख्या : जम्मू-काश्मीर 156 षटकांत 6 बाद 527 (शुभम पुंडिर 121, यावर हसन 88, पारस डोगरा 70, कन्हैया वाधवान 70, साहिल लोत्रा खेळत आहे 54, प्रसिद्ध कृष्णा 3/90).

Advertisement
Tags :

.