रानी मुखर्जीचा ‘मर्दानी 3’ येतोय
चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
रानी मुखर्जीचा आगामी चित्रपट ‘मर्दानी 3’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. रानी पुन्हा एकदा दबंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येतेय. यावेळी तिची व्यक्तिरेखा जे प्रकरण हाताळणार, ते अत्यंत धोकादायक असेल. निर्मात्यांनी ट्रेलरसोबत प्रदर्शनाची तारीखही शेअर केली आहे.
मर्दानी 3 चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रानी मुखर्जीची एंट्री स्वत:ची जुनी व्यक्तिरेखा शिवानी शिवाजी रॉयच्या स्वरुपात होते. शिवानीला यावेळी नवे प्रकरण हाताळण्यास दिले जाते. शिवानी बेपत्ता मुलींचा शोध घेत त्यांना वाचविण्याच्या मिशनवर आहे. या चित्रपटात महिलांशी निगिडत गंभीर मुद्दे मांडण्यात आले आहेत. चित्रपटात सैतान फेम जानकी बोडीवाला यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
चित्रपटात खलनायिकेची भूमिका मल्लिका प्रसाद यांनी साकारली आहे. त्यांची व्यक्तिरेखा मुलींना गायब करणारी टोळी चालवत असते. ट्रेलरमध्ये त्यांची शैली अत्यंत भीतीदायक असून अभिनय प्रभाव पाडणारा आहे. रानीचा हा चित्रपट 30 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सने केले आहे. तर दिग्दर्शन अभिराज मीनावालाने केले आहे.