For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अक्षयसोबत झळकणार रानी मुखर्जी

06:01 AM Jan 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
अक्षयसोबत झळकणार रानी मुखर्जी
Advertisement

ओह माय गॉड फ्रेंचाइजीचा हिस्सा ठरणार

Advertisement

रानी मुखर्जी आणि अक्षय कुमार दोघेही 90 च्या दशकातील प्रसिद्ध कलाकार आहेत. या दोघांनी स्वत:च्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.  परंतु चाहत्यांना त्यांची जोडी कधीच मोठ्या पडद्यावर पाहता आलेली नाही. आता चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. रानी स्वत:च्या 28 वर्षांच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच अक्षय कुमारसोबत काम करणार आहे. अक्षयच्या एका यशस्वी फ्रेंचाइजीत रानी मुखर्जीची एंट्री झाली आहे. रानी आता ओह माय गॉड या फ्रेंचाइजीच्या पुढील चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. ओह माय गॉडच्या तिसऱ्या भागात रानी मुखर्जीची वर्णी लागल्याने कहाणीत एक नवा ताजेपणा येणार आहे.

ओह माय गाड 3 चे निर्मितीपूर्व काम सुरू झाले असून चालू वर्षाच्या मध्यापर्यंत याचे चित्रिकरण सुरू होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय करणार आहे. ओएमजी 3 ची कहाणी अधिक प्रभावी राहणार असल्याचे संकेत अक्षय कुमारने यापूर्वीच दिले आहेत. ओह माय गॉडच्या पहिल्या चित्रपटात अक्षयसोबत परेश रावल हे मुख्य भूमिकेत होते. तर दुसऱ्या भागात पंकज त्रिपाठी यांनी अक्षयसोबत काम केले होते. आता तिसऱ्या भागाच्या कहाणीविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.