For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हलगा, बस्तवाड, मच्छे, पिरनवाडी भागात रंगपंचमी उत्साहात

11:07 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
हलगा  बस्तवाड  मच्छे  पिरनवाडी भागात रंगपंचमी उत्साहात
Advertisement

वार्ताहर/किणये 

Advertisement

तालुक्याच्या काही गावांमध्ये मंगळवारी रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. मच्छे, पिरनवाडी, हलगा, बस्तवाड या गावांमध्ये मोठ्या जल्लोषात रंगोत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक ढोल ताशा व डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिकरताना दिसून आली. एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पारंपरिक पद्धतीने बस्तवाड, हालगा, मच्छे व पिरनवाडी गावातील हकदार, पंच कमिटी व पुजारी यांच्यावतीने मंगळवारी सकाळी होळी कामाणा व देवतांची पूजा करण्यात आली. हलगी व पारंपरिक वाद्यांचा गजर करून रंगोत्सवाला सुरुवात झाली. यानंतर गावांमध्ये रंग खेळण्यास सुरुवात करण्यात आली. गल्ल्यागल्ल्यांमध्ये तसेच ठिकठिकाणी चौकात तरुणांनी डॉल्बी व ढोल ताशांची सोय केली होती. विविध गाण्यांच्या तालावर तरुणाई नृत्य सादर करताना दिसत होती. ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारून पाण्याची फवारणी करण्यात येत होती. त्यामुळे तरुणाई रंगात न्हाऊन गेली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.