For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात रंगपंचमी अमाप उत्साहात

06:04 AM Mar 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात रंगपंचमी अमाप उत्साहात
Advertisement

डॉल्बीच्या तालावर थिरकली तरुणाई : गावागावांमध्ये रंगपंचमीच्या शुभेच्छा देत लुटला रंगोत्सवाचा आनंद

Advertisement

► वार्ताहर/ किणये

तालुक्यात शनिवारी रंगपंचमी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या व ढोल ताशांच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसून आली. एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सकाळपासूनच गावागावांमध्ये रंग खेळण्यास सुऊवात झाली होती.

Advertisement

तालुक्याच्या विविध गावांमध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. यंदा मात्र होळीच्या सहाव्या दिवशी म्हणजे शनिवारी साजरी करण्यात आली. दुपारी बारा वाजेपर्यंत अवघा तालुका रंगात रंगून गेला होता. गावच्या वेशीवर, गल्ल्यांमध्ये, कोपऱ्यांवर, चौकात रंग खेळण्याचे आयोजन करण्यात आले होते. काही गावांमध्ये दुपारी बारापर्यंत तर काही ठिकाणी साडेबारापर्यंत रंगपंचमी साजरी करण्यात आली.

हलगी व पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातील होळी कामण्णा व सर्व देवतांची पूजा चर्चा करण्यात आली. त्यानंतर रंगोत्सवाला प्रारंभ झाला. शनिवारी सकाळी आठ वाजता गावांमध्ये रंगपंचमीला सुऊवात झाली. यामध्ये बालकांसह तऊणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. बऱ्याच गावांमध्ये यंदा डॉल्बीला फाटा देण्यात आला. तरीही बऱ्याच गावांमध्ये रंगाची उधळण करीत नृत्य करतानाचे चित्र पहावयास मिळाले.

तालुक्मयाच्या मच्छे, पिरनवाडी, हलगा, बस्तवाड या गावांमध्ये धुलीवंदन, तर उर्वरित तालुक्मयाच्या सर्व गावांमध्ये शनिवारी रंगपंचमी साजरी करण्यात आली. ग्रामीण भागात आजही रंगपंचमी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याची प्रथा आहे.

सध्या तालुक्मयात तापमान वाढले आहे. कडक उन्हाचे चटके बसू लागले आहेत. बहुतांशी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. यामुळे सुक्मया रंगाची  उधळण करण्यावर अधिक भर देण्यात आला.

गेल्या चार-पाच दिवसापासून रंगपंचमीची तयारी तऊणांनी केली होती. त्यानुसार शनिवारी रंगोत्सवाचा आनंद लुटला. रंगपंचमी म्हणजे ग्रामीण भागात त्या दिवशी मटणाचा बेत हा ठरलेलाच असतो. शनिवारी दुपारनंतर शेत शिवारांमध्ये तऊणांच्या ओल्या पार्ट्याही रंगल्या होत्या.

होळी सणातील पाच दिवस शेतकरी वार पाळणूक करतात. या दिवसांमध्ये शिवारातील कामेही काही ठिकाणी बंद होती. त्यामुळे गावामध्ये, मंदिरांमध्ये नागरिकांच्या चर्चा रंगलेल्या दिसून आल्या.

शनिवारी सकाळपासून रंगोत्सवाला सुऊवात झाली. प्रारंभी हलगी वाद्यांसह हक्कदार व पुजारी यांनी गावातील देवदेवतांची पूजा केली. त्यानंतर सर्वत्र रंग खेळण्यास सुऊवात झाली. वडगाव ग्रामीण पोलीसही ग्रामीण भागात नजर ठेवून होते. कडक उन्हाच्या चटक्मयातही साऱ्यांनी रंगोत्सवाचा आनंद लुटला.

Advertisement
Tags :

.