For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur | सोलापुरातील जुळे द्वारकाधीश मंदिरात रंगपंचमी उत्साहात साजरी

04:40 PM Mar 03, 2026 IST | NEETA POTDAR
solapur   सोलापुरातील जुळे द्वारकाधीश मंदिरात रंगपंचमी उत्साहात साजरी
Advertisement

               सोलापुरातील द्वारकाधीश मंदिरात होळीचा रंगीबेरंगी उत्सव

Advertisement

सोलापुर - होळी केवळ रंगांचा सण नाही, तर तो प्रेम, एकता आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. श्रीकृष्णाच्या लीलांमुळे होळीला प्रेम आणि आनंदाचा विशेष आध्यात्मिक स्पर्श मिळतो. पुराण काळापासून होळीचा सण साजरा करण्याची प्रथा, परंपरा आहे.

जुळे सोलापूर येथील द्वारकाधीश मंदिरात होळी निमित्ताने रंगपंचमी साजरी करण्यात आली. प्रथम श्रीकृष्णच्या मूर्तीस रंग लावण्यात आला. यावेळी मंदिरात महिलांचा मोठा सहभाग होता. फुगडी व गरबा गीत खेळून होळीचा उत्सव आनंदाने साजरा करण्यात आला.

Advertisement

पाण्याचा व केमिकल युक्त रंगांचा जास्त वापर न करता कोरड्या रंगचा वापर करण्यात आला. सुगंधी रंग व पिचकारीने लहान मुलांनी रंग उधळून रंगपंचमी साजरी केली.

Advertisement
Tags :

.