For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रांगोळीतून शिवरायांसह मावळयांना मानाचा मुजरा

05:50 PM Feb 19, 2025 IST | अनुजा कुडतरकर
रांगोळीतून शिवरायांसह मावळयांना मानाचा मुजरा
Advertisement

सावंतवाडी -

Advertisement

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी येथे १९ फेब्रुवारी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांसह मावळयांना रांगोळीतून मानाचा मुजरा देण्यात आला. यानिमित्ताने प्रशालेच्या सभागृहात 4 फूट बाय 35 फूट अशी भव्य आकाराची रांगोळी साकारण्यात आली . छत्रपतीचा मान हाच आमचा स्वाभिमान याच ब्रीदाशी एकनिष्ट राहत व आपल्या प्राणांची आहुती देणारे मावळ्याच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य प्रस्थापित केले आणि शिवप्रताप एक इतिहास झाला या संकल्पनेतून कलाशिक्षक श्री केदार टेमकर यांच्या सह विद्यार्थ्यानी शिवाजी महाराज व 14 मावळे यांची सुरेख भव्य अशी व्यक्तिचित्र रांगोळी साकारली . या रांगोळी साठी तब्बल 16 तासाचा कालावधी लागला . या सभागृहातील रांगोळीचे प्रदर्शन दिनांक 28 फेब्रुवारी पर्यत खुले राहणार आहे .

Advertisement
Advertisement
Tags :

.