कलाशिक्षक केदार टेमकर यांनी साकारल्या कोकणरत्नांच्या रांगोळ्या
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलचे कलाशिक्षक केदार टेमकर यांनी भोसले नॉलेज सिटी सावंतवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कोकणचे भूषण असणाऱ्या कलाकारांसोबतच अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांच्या रांगोळ्या साकारल्या . यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील तेंडोली गावचे सुपुत्र तथा लेखक आरती प्रभू, सचिन तेंडुलकर यांचे मार्गदर्शक म्हणून ओळख असलेले मालवणचे सुपुत्र रमाकांत आचरेकर , लेखक, नाटककार, पत्रकार अशी ओळख असलेले आरवली गावचे सुपुत्र जयवंत दळवी.वेंगुर्ल्याचे सुपुत्र कविवर्य मंगेश पाडगावकर आणि मालवण तालुक्यातील रेवंडी गावचे सुपुत्र आणि ज्यांनी मालवणी बोली भाषा लोकप्रिय केली ते नाटककार मच्छिंद्र कांबळी अशा सिंधुदुर्गातील पंचरत्नांचे व्यक्तिचित्र रांगोळीच्या माध्यमातून कलाशिक्षक केदार टेमकर यांनी साकारली असून आपल्याला ही संधी दिल्याबद्दल टेमकर यांनी आयोजकांचे आभार मानले आहेत .