रणदीप हुडा पत्नी लीन सोबत बुडापेस्टमध्ये करतोय एन्जॉय
मुंबई
रणदीप हुडा सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शक सॅम हरग्रेव्ह यांच्या आगामी मॅचबॉक्स या सिनेमाचे चित्रीकरण बुडापेस्ट येथे सुरू आहे. या सिनेमात रणदीप हुडा जॉन सिनासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.रणदीप हुडाने या दिग्दर्शकासोबत २०२० मध्ये नेटफिक्स साठी काम केले होते. या आगामी चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असताना, रणदीप हुडा त्याच्या प्रिय पत्नी समवेत क्वॉलीटी टाईम घालवण्याचा प्रयत्न करत आहे.
रणदीप हुडाची पत्नी लिन लायश्रम ही काही दिवसापूर्वीच बुडापेस्टला रवाना झाली. दोघेही बुडापेस्टमध्ये रोमॅंटीक टाईम स्पेंड करतानाचे काही खास क्षण त्यांनी सोशल मिडीयावरून आपल्या चाहत्यांशी शेअर केले आहेत.
शुटींग दरम्यान रणदीप हुडा आणि पत्नी लीन लायश्रम बुडापेस्टमध्ये शहरातील आर्टीटेक्ट, शहरातील विविध टुरीस्ट स्पॉट पाहताना या फोटो शेअर केले आहेत. रणदिप हुडा आणि लीन लायश्रम यांनी २९ नोव्हेंबर २०२३ मध्ये लग्न केले.
याशिवाय रणदीप हुडाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयच झालं त्याचा जाट हा बहुचर्चित सिनेमा येत आहे. या सिनेमात सनी देओल आणि अर्जून उत्सारा दिसणार आहेत. विशाल भारद्वाज आणि शाहीद कपूर ही या प्रोजेक्टशी जुडलेले आहेत.