For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रानबांबुळीत गोवा बनावटीची 3.12 लाखांची दारू जप्त; एकाला ताब्यात

रानबांबुळीत गोवा बनावटीची 3 12 लाखांची दारू जप्त  एकाला ताब्यात
Advertisement

कुडाळ : राज्य उत्पादन शुल्क कुडाळ शाखेच्या पथकाने रानबांबुळी-ख्रिश्चनवाडी येथे धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत विविध वर्णनाची दारू असलेले एकूण 37 खोके जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत ३ लाख 12हजार 160 रुपये असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.

Advertisement

राज्य उत्पादन शुल्क कुडाळ शाखेला रानबांबुळी परिसरात गोवा बनावटीच्या दारूचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक एम. एस. गरुड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास रानबांबुळी-ख्रिश्चनवाडी येथे सापळा रचून छापा टाकला.

या छाप्यात गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे विविध प्रकारचे एकूण 37 खोके आढळून आले. पथकाने हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पॉल मार्शल फर्नाडिस (रा. रानबांबुळी-ख्रिश्चनवाडी) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम. एस. गरुड यांनी केली. कारवाईत दुय्यम निरीक्षक यू. एस. थोरात, दुय्यम निरीक्षक ए. ए. वंजारी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरज चौधरी], जवान जे. आर. चव्हाण व एन. पी. राणे यांनी सहभाग घेतला. मदतनीस म्हणून राऊळ व परब यांनी सहकार्य केले.

Advertisement
Tags :

.