For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रामरहिम याची ‘फर्लो’वर मुक्तता

06:25 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
रामरहिम याची ‘फर्लो’वर मुक्तता
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

डेरा सच्चा सौदा या पंथाचा प्रमुख गुरुमित रामरहिम याची 21 दिवसांच्या ‘फर्लो’वर कारागृहातून मुक्तता करण्यात आली आहे. हरियाणातील रोहतक येथील मध्यवर्ती कारागृहात तो शिक्षा भोगत आहे. या वर्षात त्याची अशी तिसऱ्यांदा, तर त्याच्या एकंदर शिक्षाकाळात आठव्यांदा तात्पुरती मुक्तता करण्यात आली आहे. त्याच्या मुक्ततेसाठी प्रशासनाने अनेक अटी घातल्या आहेत.

मुक्ततेनंतर त्याला त्वरित उत्तर प्रदेशातील बर्नावा येथील आश्रमात नेण्यात आले आहे. फर्लोच्या काळात त्याला हा आश्रम सोडून कोठेही अन्य स्थानी जाता येणार नाही. तसेच त्याच्यावर सतत पोलिसांचा पहारा असेल. त्याला त्याच्या महिला शिष्यांवर केलेल्या बलात्कार प्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. फर्लोवर त्याची सुटका करण्यास शिरोमणी अकाली दलाच्या प्रबंधक समितीने विरोध केला होता. तथापि, प्रशासनाने सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.