For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव यांचे निधन

06:45 AM Jun 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव यांचे निधन
Advertisement

पत्रकारिता आणि चित्रपट जगतात अमिट छाप : 2016 मध्ये ‘पद्मविभूषण’ने गौरव

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

मीडिया क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व आणि रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव यांचे शनिवारी पहाटे 4.50 वाजता निधन झाले. हैदराबादच्या स्टार हॉस्पिटलमध्ये वयाच्या 87 व्या वषी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामोजी राव हे 5 जूनपासून आयसीयूमध्ये दाखल होते. हृदयाशी संबंधित समस्या निर्माण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

Advertisement

रामोजी राव यांचे पार्थिव त्यांच्या रामोजी फिल्मसिटी येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. येथे त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांनी त्यांना श्र्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तेलंगणा सरकारने रामोजी राव यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याची घोषणा केली आहे.

रामोजी राव यांचे पूर्ण नाव चेऊकुरी रामोजी राव होते. त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी आंध्रप्रदेशातील कृष्णा जिह्यातील पेडापरपुडी गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना भारताचे ऊपर्ट मर्डोक म्हणतात. त्यांना काही वर्षांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. मात्र, उपचारानंतर तो पूर्णपणे बरा झाला. रामोजी यांच्या पश्चात पत्नी रमा देवी आणि मुलगा किरण असा परिवार आहे. ते किरण ईनाडू पब्लिकेशन ग्रुप आणि ईटीव्ही चॅनेलचे प्रमुख आहेत.

रामोजी यांनी दूरचित्रवाणी वाहिन्यांचे ईटीव्ही नेटवर्क आणि तेलुगू वृत्तपत्र ‘ईनाडू’चे प्रमुख देखील होते. रामोजी यांना पत्रकारिता, साहित्य आणि शिक्षणातील योगदानाबद्दल 2016 मध्ये देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. रामोजी यांचा धाकटा मुलगा चेऊकुरी सुमन याचे 7 सप्टेंबर 2012 रोजी रक्ताच्या कर्करोगाने निधन झाले होते.

रामोजी राव हे प्रसारमाध्यम आणि पत्रकारिता क्षेत्रातील मोठे नाव होते. त्यांनी 1962 मध्ये रामोजी ग्रुपची स्थापना केली असून त्यात रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद येथील जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ, उषा किरण मूव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रीब्युटर्स, मार्गदर्शी चिटफंड आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स यांचा समावेश आहे.

नरेंद्र मोदींच्या शोकभावना

नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ वर रामोजी राव यांच्यासोबतचा स्वत:चा फोटो पोस्ट करत  शोकसंदेश जारी केला आहे. ‘रामोजी राव यांचे निधन खूप दु:खद आहे. भारतीय माध्यमांमध्ये क्रांती घडवणारे ते द्रष्टे होते. पत्रकारिता आणि चित्रपट जगतात त्यांनी अमिट छाप सोडली आहे. त्यांनी मीडिया आणि मनोरंजनाच्या जगात नावीन्य आणि उत्कृष्टतेसाठी नवीन मानक स्थापित केले. रामोजीरावांना भारताच्या विकासाची आवड होती. मी भाग्यवान आहे की मला त्यांच्याशी संवाद साधण्याच्या अनेक संधी मिळाल्या’ असे मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.