For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईतील रेल्वे अपघातात रामेश्वरच्या तरुणाचा मृत्यू

09:59 PM Apr 17, 2026 IST | अनुजा कुडतरकर
मुंबईतील रेल्वे अपघातात रामेश्वरच्या तरुणाचा मृत्यू
Advertisement

ठाणे रेल्वे स्टेशन येथील घटना

Advertisement

देवगड : प्रतिनिधी

देवगड तालुक्यातील मूळ रामेश्वर कोलवाडी येथील तेजस उदय पवार (३०, सध्या रा. दिवा मुंबई) याचा मुंबई येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वेस्टेशन दरम्यान घडली. काकांच्या दिवसकार्याला जाताना तेजसवर काळाने घाला घातला. रामेश्वर येथील जि.प.च्या माजी सदस्या वर्षा पवार यांचा तो मुलगा आहे.त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, वहिणी असा परिवार आहे.देवगड तालुका नाभिक संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा सल्लागार उदय पवार यांचा तो मुलगा होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.