ओटवणे येथील रमेश वरेकर यांचे निधन
ओटवणे । प्रतिनिधी
ओटवणे कापईवाडी येथील रहिवासी रमेश न्हानू वरेकर (५७) यांचे शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी रात्री गोवा बांबोळी रुग्णालयात निधन झाले. गेले दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे ते माजी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष होते. सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. पायलट म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम केले. शनिवारी दुपारी त्यांचे पार्थिव गावात आणल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत वरेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी ग्रामपंचायत सदस्य रंजना वरेकर यांचे ते पती, रामा उर्फ साई वरेकर, न्हानू उर्फ नागेश वरेकर यांचे ते वडील, प्रसिद्ध मूर्तिकार सुरेश वरेकर आणि पांडुरंग वरेकर यांचे ते भाऊ तसेच युवा आर्टिस्ट रोहित वरेकर आणि शुभम वरेकर यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, दोन भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे.