For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ramesh Mhatre Controversy महिला डॉक्टरला मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकाचा अटकेनंतर अचानक रक्तदाब वाढला

05:38 PM Jul 09, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
ramesh mhatre controversy महिला डॉक्टरला मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकाचा अटकेनंतर अचानक रक्तदाब वाढला
Advertisement

मुंबईतील शास्त्रीनगर परिसरातल्या एका सरकारी रुग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर अटकेत असणारे शिवसेना शिंदे पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे.  मारहाण प्रकरणातील आरोपी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक झाल्यानंतर काही तासांतच उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना गुरुवारी प्रत्यक्ष कल्याण न्यायालयात हजर केले जाणार की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होणार, याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement

रुग्णांशी अनुचित वर्तनाचा आरोप

7 जून रोजी शास्त्रीनगर येथील सरकारी रुग्णालयात रुग्णांशी अनुचित वर्तन केल्याचा आरोप करत नगरसेवक म्हात्रे यांनी एका पुरुष डॉक्टरसह एका महिला डॉक्टरलाही मारहाण केल्याचा सीसीटिव्ही व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर सोशल मिडीयावर तर्क -वितर्कांना उधाण आलं होतं. या घटनेनंतर अनेक राजकीय प्रतिक्रियाही समोर आल्या होत्या. 

Advertisement

View this post on Instagram

A post shared by NDTV (@ndtv)

डॉक्टरांचा संप

डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटनेनंतर  निषेध व्यक्त करत कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांनी बुधवारी ओपीडी सेवा बंद ठेवली . तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डोंबिवली शाखेच्या बैठकीत गुरुवारीही शहरातील दवाखाने आणि रुग्णालयांतील ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आयएमएचे पदाधिकारी डॉ. मंगेश पाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुढील प्रक्रिया तपासणीनंतर

नगरसेवक आरोपी रमेश म्हात्रे यांना अचानक रक्तदाब वाढल्याने आता त्यांच्या तपासणीनंतर वैद्यकिय अहवाल प्राप्त झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पुढे सुरु होणार आहे. दरम्यान ज्या रुग्णासाठी नगरसेवक म्हात्रे यांनी डॉक्टरांना मारहाण केली त्या पेशंटच्या पत्नीने एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले की, डॉक्टरांनीच माझ्या पतीशी केलेल्या गैरवर्तनानंतर नगरसेवक म्हात्रे यांनी मारहाण केली.

Advertisement
Tags :

.