विश्व कुस्ती स्पर्धेसाठी रामचंद्र पवार प्रशिक्षकपदी
बेळगाव : विश्व कुस्ती संघटनेच्या वतीने अथेन्स (ग्रीस) येथे दिनांक 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय महिला कुस्ती संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून मांडेदुर्ग (ता.चंदगड) येथील रामचंद्र माऊती पवार यांची भारतीय कुस्ती संघाने निवड केली आहे. युथ ऑलिम्पकि गेम्स,विश्व कुस्ती स्पर्धा तसेच आशियाई कुस्ती स्पर्धा अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्य केले आहे.मराठा लाईट इंन्फंट्री बेळगाव येथे कुस्तीचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते.नुकतीच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे प्रख्यात कोच म्हणून टॅलेंट इडेंटिफिकेशन डेव्हलपमेंट कमिटी मध्येही नुकतीच निवड झाली आहे व भारतीय सेनेमध्ये मुख्य कुस्ती प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याबरोबर सहकारी कोच म्हणून समीक्षा (हरियाणा ), सिकंदर (भारतीय रेल्वे ) तर फिजिओ म्हणून लतिका ( मध्य प्रदेश ) यांचाही सहभाग आहे. वेगवेगळ्या दहा वजन गटांमध्ये 10 महिला कुस्तीगरांचा संच घेऊन ते रवना होणार आहेत यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.