For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी रामचंद्र उर्फ आबा दळवी

05:54 PM Jul 30, 2025 IST | अनुजा कुडतरकर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी रामचंद्र उर्फ आबा दळवी
Advertisement

विलवडे गावचे सुपुत्र आबा दळवी

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी

विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र उर्फ आबा धर्माजी दळवी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आबा दळवी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य असुन उपाध्यक्ष पदापूर्वी ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते.मूळचे विलवडे येथील आबा दळवी आपल्या उद्योग व्यवसायानिमित्त नवी मुंबईत स्थायिक असून दळवी यांचे घराणे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. दळवी यांचे वडील कै धर्माजी दळवी यांनीही काँग्रेस पक्षात महत्त्वाची पदे भूषविली. नवी मुंबई जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तसेच पक्षात अनेक महत्त्वाच्या पदावर काम करून काँग्रेस वाढीसाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. तसेच विविध उपक्रमातून त्यांनी काँगेसचे कार्यकर्ते घडविले. महाराष्ट्र सह इतर राज्यातील निवडणुका काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी आबा दळवी यानी चौखपणे पार पाडीत पक्षाला यश मिळवून दिले. पक्ष संघटनेतील त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नवी मुंबई व विलवडे परिसराच्या शैक्षणिक, सामाजिक, क्रिडा, धार्मिक कार्यात आबा दळवी नेहमी अग्रस्थानी असतात. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांनी अनेक समाजपयोगी उपक्रमांना तसेच गोरगरीबांना वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. आबा दळवी यांच्या या निवडीबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.