For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाचा निकाल ९४.३३ टक्के

05:46 PM May 02, 2026 IST | अनुजा कुडतरकर
स  का  पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाचा निकाल ९४ ३३ टक्के
Advertisement

वाणिज्य शाखेची 100 टक्के निकालाची परंपरा कायम

Advertisement

मालवण :

कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ९४.३३ टक्के लागला आहे. महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेने १०० टक्के निकालाची आपली यशाची परंपरा यंदाही कायम राखली असून, कला शाखेचा निकाल ८७.५० टक्के लागला आहे.​यावर्षी कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण ५३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते, त्यापैकी ५० विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत.

Advertisement

​ वाणिज्य शाखेत मुलींचे वर्चस्व

​वाणिज्य शाखेतून एकूण २९ विद्यार्थी प्रविष्ट आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत प्रथम तिन्ही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे.

​प्रथम क्रमांक: कु. रिद्धी रवींद्र केळुसकर (४८८/६००, ८१.३३%)
​द्वितीय क्रमांक: कु. संजीवनी लक्ष्मण केळुसकर (४५१/६००, ७५.१७%)
​तृतीय क्रमांक: कु. हेमांगी उमेश चव्हाण (४३०/६००, ७१.६७%)

​कला शाखेचे यश......
​कला शाखेतून एकूण २४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेतील गुणवंत विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत:

​प्रथम क्रमांक: कु. तन्वी गणेश जाधव (४३८/६००, ७३%)
​द्वितीय क्रमांक: कु. मिनिशा मिलिंद धुरी (४११/६००, ६८.५०%)
​तृतीय क्रमांक: कु. निशांत नितीन शिरोडकर (३९९/६००, ६७.३३%)

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. किरण ठाकूर, कार्याध्यक्ष मा. श्री. साईनाथ चव्हाण, सचिव मा. श्री. चंद्रशेखर कुशे, शालेय समिती अध्यक्ष मा. श्री. विजय केनवडकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. ​तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. के. के. राबते, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement
Tags :

.