For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रामलिंगारेड्डीनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

06:13 AM Jun 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
रामलिंगारेड्डीनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा
Advertisement

खातेवाटपावरून नाराजीनाट्या : वरिष्ठांकडून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न : दाद न दिल्यास कठोर भूमिका

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर :

Advertisement

राज्यात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली राज्य काँग्रेस सरकारचे नवे पर्व सुरू होताच खातेवाटपाच्या मुद्द्यावरून मंत्रिमंडळात असंतोष निर्माण झाला आहे. रामलिंगारेड्डी यांनी बेंगळूर शहर विकास खाते न मिळाल्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यापाठोपाठ अन्न-नागरी पुरवठा खात्यावर समाधानी नसलेले मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी देखील नाराजी उघड केली आहे. अखेर ही बाब काँग्रेसश्रेष्ठींनी गांभीर्याने घेतली आहे. शुक्रवारी बेंगळूर दौऱ्यावर आलेल्या काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी ‘समजूत काढा, दाद न दिल्यास राजीनामा स्वीकारा’, असा इशारा दिला आहे. त्यामुळे रामलिंगारेड्डी  नाराजी दूर करण्यात नेत्यांना यश येईल का, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.

गुरुवारी रात्री मंत्र्यांच्या खातेवाटपाच्या यादीला अंतिम स्वरुप मिळाल्यानंतर रामलिंगारेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. दुसरीकडे मंत्री के. एच. मुनियप्पा यांनीही मिळालेल्या खात्याबद्दल नाराजी व्यक्त केली. माझ्या अपेक्षेप्रमाणे खाते न मिळाल्यास अन्न-नागरी पुरवठा खात्याचा पदभार स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे खातेवाटपाच्या गोंधळात आणखी भर पडली.

शुक्रवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज सादर होणार असल्याने पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला बेंगळुरात आले होते. यावेळी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी खातेवाटपाबद्दल असलेल्या नाराजीबद्दल राहुल गांधी यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी के. सी. वेणुगोपाल यांना नाराज असलेल्या मंत्र्यांशी चर्चा करून समजूत काढा, ते दाद देत नसतील तर राजीनामा स्वीकारा, अशी असा इशारावजा संदेश दिला. मात्र, वरिष्ठ नेत्यांचा रामलिंगारेड्डी यांची समजूत काढण्याचे प्रयत्न शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पत्रकार परिषद घेत राजीनाम्याची दिली माहिती

बुधवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या रामलिंगारे•ाr यांनी बेंगळूर शहर विकास खात्याचे अपेक्षा ठेवली होती. मात्र, पाटबंधारे खाते मिळाल्याचे समजताच त्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेत बेंगळूर शहर विकास खाते द्या, अशी मागणी करत राजीनाम्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रामलिंगारे•ाr यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी आपले राजीनामापत्र निकटवर्तीय मावळ्ळी सत्या यांच्यामार्फत विधानसौधमध्ये मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तुषार गिरीनाथ यांच्याकडे सुपूर्द केले.

शुक्रवारी सकाळी रामलिंगारेड्डी  यांनी बेंगळूरच्या कोरमंगल येथे आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगून राजीनामापत्र दाखविले.

मुनियप्पांची समजूत काढण्यात यश

ज्येष्ठतेनुसार अपेक्षित खाते न मिळाल्याने मंत्री के. एच. मुनियप्पा यांनीही नाराजी उघड केली. ते देखील राजीनाम्याच्या तयारीत होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेर व्यथा मांडण्यासाठी आलेल्या मुनियप्पा यांची समजूत काढण्यात काँग्रेसश्रेष्ठी यशस्वी ठरले. शुक्रवारी सायंकाळी वरिष्ठ नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला यांनी मुनियप्पांची समजूत काढली. तत्पूर्वी सकाळी मुनियप्पांनी, मी 8 वेळा निवडून आलेला अत्यंत ज्येष्ठ राजकारणी आहे. मंत्रिमंडळात प्रोटोकालॅनुसार ज्येष्ठतेचा विचार करून खातेवाटप करणे अपेक्षित होते. समाजकल्याण किंवा कृषी यासारख्या थेट जनतेत मिसळून सेवा बजावण्याची संधी असणारे मोठे खाते मागितले होते. मात्र, खातेवाटपात कोणताही समतोल राखण्यात आलेला नाही, अशी नाराजी व्यक्त केली होती.

यावेळी निर्णय हायकमांडचा : शिवकुमार

मी मुख्यमंत्री बनल्यानंतर तुम्हाला बेंगळूर शहर विकास खाते देईन असे आश्वासन रामलिंगारे•ाr यांना दिले होते. ही बाब खरी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे. रामलिंगारे•ाr यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, यापूर्वीच्या मंत्रिमंडळात रामलिंगारे•ाRना परिवहन खाते देण्यात आले होते. तेव्हा मी आणि माझा भाऊ (डी. के. सुरेश) दोघांनी त्यांची समजूत काढली होती. नंतर के. सुधाकर यांच्याजवळील धर्मादाय खाते काढून घेऊन रामलिंगारे•ाRना आणखी एक खाते दिले होते. मात्र, यावेळी हायकमांडने निर्णय घेतला असून, कृष्णभैरेगौडांना बेंगळूर शहरविकास खाते वाटप करण्यात आले, असे स्पष्टीकरण शिवकुमार यांनी दिले.

दु:खही नाही, आनंदही नाही : सतीश जारकीहोळी

खातेवाटपावरून ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला असतानाच मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिलेली प्रतिक्रिया लक्ष वेधून घेत आहे. रामलिंगारेड्डी  यांना राजीनामा दिला आहे. परंतु, ही परिस्थिती हाताळण्याची आणि पर्यायी व्यवस्था करण्याची क्षमता माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात आहे. पुढील एक-दोन दिवसात समस्या सुटेल. राजकारणात महत्त्वाच्या पदाची इच्छा सर्वांनाच असते. मात्र, उच्चपदे सर्वांना दिली जाऊ शकत नाहीत. ती फक्त मोजक्याज लोकांना मिळतात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हा सर्व गोंधळ दूर करतील, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्रिपद किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद न मिळाल्याने नाराज आहात का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, मला इच्छा होती, पण मी काहीही करू शकत नाही. जे मिळाले आहे, त्यात समाधान मानले पाहिजे. मिळालेल्या खात्याबद्दल मला दु:खही नाही, आनंदही नाही, अशी सावध प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करेन!

मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, आमदार आणि पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करेन. मी कोणावरही नाराज नाही. मी 37 वर्षे आमदार म्हणून काम केले आहे. मी मंत्रिपदासाठी कधीही लॉबिंग केलेली नाही, दिल्लीला देखील गेलो नाही.

- रामलिंगारे•ाr

Advertisement
Tags :

.