For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पुण्यातील MPSC आंदोलनाला सीमाभागातील रमाकांत कोंडूसकरांचा पाठिंबा !

09:28 PM Oct 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुण्यातील mpsc आंदोलनाला सीमाभागातील रमाकांत कोंडूसकरांचा पाठिंबा
Advertisement

MPSC आंदोलकांना कोंडुसकरांनी भरवला चटणी भाकरी आणि कुंद्याचा घास पुणे 

Advertisement

विविध मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विद्यार्थ्यांना सीमाभागातील कार्यकर्त्यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन त्यांची तातडीने पूर्तता करावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

या भेटीदरम्यान सीमाभागातील आपुलकी आणि खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडले. आंदोलक विद्यार्थी विवेकानंद पाटील यांना बेळगावची प्रसिद्ध भाकर-चटणी आणि खास कुंदा भरवून त्यांच्याप्रती जिव्हाळा व्यक्त करण्यात आला. आंदोलनाच्या धामधुमीतही माणुसकीचे नाते जपणाऱ्या या कृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

Advertisement

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे आमदार रोहित पवार यांचा सीमाभागातील कार्यकर्त्यांच्या वतीने घोंगडी देऊन सन्मान करण्यात आला. या माध्यमातून त्यांच्या भूमिकेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन आंदोलनावर तातडीने तोडगा काढावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. सीमाभागातून मिळालेल्या या पाठिंब्यामुळे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना आपल्या लढ्याला नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या वेळी अमित देसाई, राजेंद्र बैलूर, विनोद बिर्जे, दिनेश जगताप, अजय सावंत, मंदार पाबळ, रईस बागवान आणि प्रणय पाटील उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.