महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राम दूत हनुमान....3

06:05 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आजकाल आपण पाहतो कोणत्याही पार्टीचा वा पक्षाचा मनुष्य स्वत:ला नेता समजत असतो. कोणीही कार्यकर्ता बनायला तयारच नसतात. अशा वेळेला हनुमंताचं उदाहरण दिलं जातं. नेता सबळ किंवा सशक्त असेल तर उत्तम कार्यकर्ते मात्र हाताखाली कसे घडतात याचे उदाहरण म्हणजे हनुमंत. कार्यकर्ता कसा असावा याचं उदाहरण त्याच्या प्रत्येक कृतीवरून आपल्याला दिसतं. हनुमंत काम करताना किंवा काम स्वीकारल्यानंतर कितीही अडथळे पुढे आले तरी ते पार करताना कधीच कोणाची तक्रार करत नाही. आम्ही कोणतेही काम करण्यापूर्वी आधी नकारांचे पाढे वाचायला सुरुवात करतो. परंतु हनुमंत असेल त्या परिस्थितीत आपलं काम काहीही करून पूर्ण करायचंच अशी एक मनाशी खूणगाठ बांधून निघतात.

Advertisement

याचे उदाहरण ते जेव्हा सीतामाईंना शोधायला लंकेकडे निघाले. त्यावेळी वाटेत त्यांना अनेक अडथळे आले. अपयश आले तरी आपण निष्ठेने पुढे जात राहायचं असतं. आजकाल आपण बघतो. आमच्या सगळ्यांमधली ही निष्ठाच हरवून बसली आहे. आमच्या प्रमुखावर किंवा आमच्या घरातल्या मोठ्या माणसांवर विश्वास ठेवायचा असतो, श्रद्धा ठेवायची असते भक्ती ठेवायची असते. याची जाणीव पावलो पावली, हनुमंताच्या वागण्यातून, बोलण्यातून आम्हाला येते. हनुमंताने आपला बडेजाव कधीच, कुठेही मिरवला नाही, फक्त तत्पर सेवेला हजर राहून रामांना यश मिळवून दिलं. असा हनुमंत आम्हाला कार्यरत व्हायला सांगतो. राम आणि लक्ष्मणाला नागपाश लागल्यानंतर त्यांना त्यातून सोडवण्यासाठी हनुमंताने कुठलाही विचार न करता हा नागपाश तोडू शकणाऱ्या गरुडाला येण्याची विनंती केली. पुढे राम रावण युद्धात लक्ष्मणावर आघात झाल्यानंतर सर्वप्रथम हनुमंताने काय केलं असेल तर श्रीलंकेतील सुशेण नावाचे आयुर्वेदाचार्य, तज्ञ होते त्यांना ताबडतोब तेथे घेऊन आला. तिथे आणल्यानंतर त्यांनी जी परीक्षा केली त्यांनी जो उपाय सांगितला तो आणण्यासाठी श्रीरामांच्या परवानगीने हनुमंताने उ•ाण केलं पण ही औषधी दुसऱ्या दिवशी सूर्योदय होण्याच्या आत आणायला हवी होती. हे ऐकल्यानंतर क्षणभर सूर्याकडे पाहून हनुमंताने मनात निश्चय केला. त्याच्या ह्या मानसिकतेचे वर्णन तुलसीदास यांनी आपल्या काव्यात फार सुंदर रीतीने केले. हनुमंत सूर्याला बजावून सांगताहेत आणि मग दमदाटी करतायेत त्याचं हे उदाहरण ‘हे सुरज इतना याद रखो संकट सुरज वंश पर है, लंका ने किया आघात दिनेश वंश पर है

Advertisement

(पूर्वार्ध)

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article