For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राम मंदिराचा शिलन्यास त्यावेळीच राजीव गांधींनी केला होता; इतिहासाची आठवण करत शरद पवारांचा भाजपवर निशाणा

05:22 PM Jan 16, 2024 IST | Abhijeet Khandekar
राम मंदिराचा शिलन्यास त्यावेळीच राजीव गांधींनी केला होता  इतिहासाची आठवण करत शरद पवारांचा भाजपवर निशाणा
Jalgoan Sharad Pawar
Advertisement

भाजप राजकारणासाठी धार्मिक मुद्द्यांचा आधार घेत असून त्यामुळे लोकांचे मन वळवले जात आहे. बाबरी मंदीराच्या पतनानंतर राजीव गांधी यांनी लगेच तिथे जाऊन राम मंदिराचा शिलन्यास केला होता. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच भाजप आणि आरएसएसकडून मतासाठी प्रभु श्रीराम, आणि हनुमान यांचा वापर केला जात असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज निपाणी (Nipani) आणि कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर असून असून त्यांनी निपाणी येथे जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार टिका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, "होऊ घातलेल्या प्रभु रामांच्या मंदिराच्या कार्यक्रमाचा मी आदर करतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे देशातील गरीबी घालवण्यासाठीसुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रम हाती घेणार आहे का? अशी विचारणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या दहा दिवसांच्या उपवास देशातील लोकांची उपासमार घालण्यासाठी सुद्धा करावा." असा खोचक टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

पुढे बोलताना त्यांनी भाजपला इतिहासाची आठवण करून दिली. यावेळी शरद पवार बोलताना म्हणाले की, "मशीद पडल्यानंतर राम मंदिर बांधण्याचा निर्णय राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये झाला होता. राजीव गांधी यांच्या हस्ते शिलान्यासही करण्यात आला होता. मात्र, आता राम मंदिराचे मुळ काम बाजूला राहिलं असून भाजप आणि आरएसएसकडून याचा मतासाठी फायदा करून घेतला जात आहे." असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

जयतं पाटलांचाही भाजपवर हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भाजपवर हल्लाबोल करताना जोरदार टिका केली. ते म्हणाले "ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत उत्साह दिसत होता त्याच पद्धतीचा उत्साह आज आज निपाणीमध्ये दिसत आहे. सध्या देशातील परिस्थिती वेगळी असून कर्नाटकात बजरंग बलीचा आधार घेतला होता आता देशात रामाचा आधार घेतला जात आहे. सामान्य जनतेला महत्व आणि गरज नसलेल्या गोष्टी जनतेसमोर ठेवल्या जात आहेत. त्यामुळे महागाई आणि इतर समस्या झाकून ठेवण्यासाठी इतर गोष्टी केल्या जातात." असाही टोला त्यांनी लगावला.

Advertisement
Tags :

.